Home /News /national /

प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा निर्णय सोनिया गांधी घेणार, सूत्रांची माहिती

प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा निर्णय सोनिया गांधी घेणार, सूत्रांची माहिती

सोनिया गांधी (Sonia Gandhi)अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    नवी दिल्ली, 02 सप्टेंबर: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) यांचा काँग्रेस (Congress) पक्षात समावेश करण्याबाबत पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोनिया गांधी यांनी यावर अनेक वरिष्ठ नेत्यांशी या विषयावर चर्चा केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यावर आक्षेप घेतला आहे. तर काहींनी त्याचे समर्थन केलं आहे. कारण त्यांचा पक्ष प्रवेश ते पक्षासाठी फायदेशीर ठरेल. काही नेत्यांना असं वाटतं आहे की, त्यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची स्थिती मजबूत होईल. दरम्यान या संदर्भात सूत्रांनी सांगितलं की, अंतिम निर्णय फक्त सोनिया गांधी घेणार आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांची नियमावली; वाचा संपूर्ण नियम नाहीतर होईल कारवाई सूत्रांनी सांगितलं की, पक्षाच्या 23 नेत्यांच्या एका गटानं, ज्यांनी गेल्या वर्षी गांधींना संघटनेत बदल करण्याची मागणी केली होती. किशोर यांना काँग्रेसमध्ये सामील होण्यास आक्षेप घेतला असल्याची माहिती आहे. या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत या प्रकरणावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरुन आणि निवडणूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका स्वीकारल्याच्या चर्चेदरम्यान काँग्रेस नेत्यांनी नुकतीच राहुल गांधी यांची भेट घेतली होती. मात्र, अंतिम निर्णय झाला नसल्यानं प्रकरण प्रलंबित आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Congress, Sonia gandhi

    पुढील बातम्या