नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : काँग्रेस कार्यकारिणीची बैठक (CWC meeting) आज पार पडली. या बैठकीत सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेस पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्षपदाबाबतची चर्चा झाली. चर्चेनंतर सोनिया गांधी याच काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. तसेच नवीन अध्यक्षाची निवड पुढीलवर्षी सप्टेंबर 2022 मध्ये करण्यात येणार असल्याचं ठरलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
असे म्हटले जात आहे की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. या निवडणुकांमुळे सध्या संघटनात्मक निवडणूक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात निवडणूक घेऊन पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल आणि ती व्यक्ती आपल्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सपाटून मारखावा लागला होता. या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यावर पक्षाची कमान सोनिय गांधी यांनी अंतरिम अध्यक्ष म्हणून आपल्या हाती घेतली. मात्र, असे असताना पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा आहे असी मागणी पक्षातील नेत्यांकडून वारंवार होत होती. यासोबतच काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केली.
वाचा : फ्लेचर पटेलसोबतची लेडी डॉन कोण? फिल्म इंडस्ट्रीत काय करतेय? NCB ने खुलासा करावा - नवाब मलिक
We have full faith in Sonia Gandhi ji and nobody is questioning her leadership, says Congress leader Ghulam Nabi Azad during CWC meeting: Sources
(file photo) pic.twitter.com/F3qbMnPuZU — ANI (@ANI) October 16, 2021
मीच काँग्रेसची अध्यक्ष
आज झालेल्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी म्हटलं, मीच काँग्रेस पक्षाची पूर्णवेळ अध्यक्ष आहे. मी नेहमीच स्पष्टतेचे कौतुक केले आहे. माध्यमांतून माझ्यासोबत बोलण्याची गरज नाहीये. आपण सर्वांनी प्रामाणिकपणए चर्चा करूया. संघटनात्मक निवडणुका आणि अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सोनिया गांधी म्हणाल्या, आम्ही 30 जूनपर्यंत काँग्रेसच्या नियमित अध्यक्षांच्या निवडीचा रोडमॅप अंतिम केला होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मुदत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्याची मागणी केली होती. गुलाम नबी आझाद यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची तात्काळ बैठक घेण्याचं आवाहन केलं होतं. तर कपिल सिब्बल यांनी पंजाब काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींवरुन पक्ष नेत्रृत्वावर प्रश्न उपस्थित केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rahul gandhi, Sonia gandhi, काँग्रेस