Elec-widget

सोनिया गांधी राजकारणातून लवकरच निवृत्त होण्याची शक्यता

सोनिया गांधी राजकारणातून लवकरच निवृत्त होण्याची शक्यता

राहुल गांधीनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर आपल्या निवृत्तीची त्या घोषणा करू शकतात.

  • Share this:

दिल्ली, 15 डिसेंबर:   गेली  18 वर्ष काँग्रेसचे अध्यक्षपद  भूषवणाऱ्या  सोनिया गांधी आता राजकारणातून निवत्ती घेण्याची शक्यता आहे.  आज संसद परिसरात मी निवृत्त होणार असे संकेत त्यांनी दिले आहेत.राहुल गांधीनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर आपल्या  निवृत्तीची  त्या घोषणा करू शकतात.

राजीव गांधीनंतर काँग्रेसचे अध्यक्षपद  भूषवणाऱ्या सोनिया गांधी गांधी परिवारातील चौथ्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर 2017 पर्यंत त्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद समर्थपणे हाताळलं. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालखंडात  काँग्रेसने दोनदा केंद्रात आपली सत्ता स्थापन केली. तर देशातील  अनेक राज्यामध्ये त्यांनी सत्ता स्थापन केली. काँग्रेसकडून रायबरेली मतदार संघातून त्या दोनदा लोकसभेत अध्यक्ष झाल्यानंतर निवडून आल्या आहेत.

त्यांच्या कालखंडात काँग्रेसला देशाच्या इतिहासात सर्वात कमी जागाही मिळाल्या. आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये श्रीमती गांधी यांनी अनेक उतार चढाव पाहिले. नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल गांधींची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे यानंतर  सोनिया गांधी  काँग्रेसमध्ये कुठलं पद भूषवणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण आज पत्रकारांशी संवाद साधताना आपण लवकरच रिटायर होणार असल्याचं सुतोवाच त्यांनी केलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी निवृत्त होत असल्या तरी त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायमच राहणार आहे असं  ट्विट केलं आहे. त्या राजकारणातून नाही तर काँग्रेसची भूमीका आहे.

 

Loading...

पण यामुळे आता काँग्रेसच्या राजकारणात पुढे काय उलथापालथ  होणार हे पाहणं  आता महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 12:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...