मराठी बातम्या /बातम्या /देश /

जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान अचानक सुरू झालं सोनिया गांधींचं भाषण...

जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान अचानक सुरू झालं सोनिया गांधींचं भाषण...

देशातील वाढत्या कोरोना संक्रमणामुळे (Coronavirus In India) सरकारी कामकाज, सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) सुनावणी यासह अनेक महत्त्वाच्या बैठका ऑनलाईन होत आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 मे : देशातील वाढत्या कोरोना संक्रमणामुळे (Coronavirus In India) सरकारी कामकाज, सर्वोच्च न्यायालयाची (Supreme Court) सुनावणी यासह अनेक महत्त्वाच्या बैठका ऑनलाईन होत आहेत. या बैठकीत अनेकदा तांत्रिक कारणांमुळे अडथळा निर्माण होतो. याबाबतचं ताजं प्रकरण काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याशी संबंधित आहे.

काय आहे प्रकरण?

सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीच्या दरम्यान सोनिया गांधी यांचं भाषण ऐकू येत होतं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये वारंवार तांत्रिक अडथळा येत होता. न्यायाधीश आणि वकील त्यामुळे डिस्कनेक्ट होत होते. यावेळी अचानक सोनिया गांधी यांचं भाषण सुरु झाल्यानं सर्वांना हसू आवरलं नाही.

सर्वोच्च न्यायालयात कोरोना व्हॅक्सिन (corona vaccine) धोरणाबाबत सुनावणी होणार होती. त्यावेळी काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना कंट्रोल रुममध्ये फोन करुन अनम्यूट होण्यासाठी सांगितले. त्यानंतर माजी अर्थमंत्री आणि वकील पी. चिदंबरम यांनाही त्यांनी अनम्यूट होण्यास सांगितले. त्याचवेळी अचानक सोनिया गांधी यांचा आवाज ऐकू येऊ लागला. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीतील ते भाषण होते. सोनिया गांधी या भाषणात कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा करत होत्या. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी हे भाषण बंद करण्याची सूचना केली.

निवडणुकीतील पराभवानंतर पार पडली काँग्रेसची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे दिले संकेत

गुरुवारी होणार सुनावणी

सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाची सुनावणी सोमवारी तांत्रिक अडचणींमुळे झाली नाही. आता पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे. न्या. धनंजय वाय. चंद्रचूड, न्या. नागेश्वर राव, न्या. रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होती. यावेळी 'सर्व्हर' काम करत नसल्यानं पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Sonia gandhi, Supreme court