महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी: शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधींची मंजुरी, कोंडी फुटणार?

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी: शिवसेनेसोबत जाण्यास सोनिया गांधींची मंजुरी, कोंडी फुटणार?

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत किमान समान कार्यक्रमाच्या आधारे जाण्यास शेवटी सोनिया गांधी या तयार झाल्या.

  • Share this:

 नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर चर्चा झाली. राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत जायचं का? यावर काँग्रेसमध्ये गेले काही दिवस विचार मंथन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी शिवसेनेसोबत जाण्यास मंजुरी दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. त्यामुळे सत्तेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातले काँग्रेसचे आमदार आणि नेते हे शिवसेनेसोबत जाण्यास तयार होते मात्र सोनिया गांधी याची याला मान्यता नव्हती. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेसोबत जाण्यास सोनियांनी मंजूरी दिली अशी माहितीही सूत्रांनी दिलीय.

आमदार नाराज असल्याची चर्चा, एकनाथ शिंदे म्हणतात...

असा असेल सत्तेचा नवा फॉर्म्युला

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापनेसाठी जो पेच निर्माण झालाय तो सोडविण्यासाठी आता सर्व हालचाली दिल्लीत होताहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिल्लीत दाखल झाले असून आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना भेटल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालंय. सत्तेची कोंडी फुटावी यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असून अनेक फॉर्म्युल्यांवर चर्चा होतेय. त्यातच एक नवा तोडगा समोर आलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांच्या बैठकीत त्यावर आता अंतिम तोडगा काढण्यात येणार आहे. गेली काही दिवस काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांमध्ये अनौपचारिक बैठका होत असून त्यात एका फॉर्म्युल्यावर सगळ्यांचं एकमत होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 16-15-12 अशी मंत्रिपदाची वाटणी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रिपदासह शिवसेनेच्या वाट्याला 16, राष्ट्रवादी 15 तर काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदं दिली जावू शकतात. एकूण 42 मंत्र्यांना शपथ दिली जावू शकते.

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, मोदी आणि पवारांच्या भेटीत काय घडलं? पाहा VIDEO

Loading...

मुख्यमंत्रिपद हे अडीच वर्ष शिवसेना तर अडीच वर्ष राष्ट्रवादीकडे राहावं असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतं. शिवसेनेचा त्याला काहीही आक्षेप नाही. तर उपमुख्यमंत्रिपद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.

सभागृहात कामकाज सुरळीत चालावं यासाठी विधानसभेच्या अध्यक्षाची जबाबदारी महत्त्वाची असते. त्यामुळे ते पद राष्ट्रवादीने मागितलं आहे. मात्र त्यावर अजुन एकमत झालेलं नाही. काँग्रेसही त्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रपक्षांनाही विश्वासात घेण्यासाठी चर्चा करणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांबाबतही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...