Home /News /national /

राजकारणातली सर्वात मोठी घडामोड; UPAच्या अध्यक्षपदी पवारांच्या नावाची चर्चा, सोनिया होणार रिटायर?

राजकारणातली सर्वात मोठी घडामोड; UPAच्या अध्यक्षपदी पवारांच्या नावाची चर्चा, सोनिया होणार रिटायर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे UPA चे अध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता आहे.

    मुंबई, 10 डिसेंबर : गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य ते केंद्रातील सर्वात मोठी अपडेत हाती येत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वर्णी लागू शकते. येत्या काळात शरद पवार यांच्याकडे UPA चे अध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता आहे. तर सोनिया गांधी येत्या काळात रिटायर होणार असून त्या पदाची सूत्र शरद पवार यांच्या हाती दिली जाणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि UPAचं नेतृत्व सोनिया गांधींनंतर कुणाकडे द्यावं यावर गेल्या अनेक दिवसांमध्ये धुसफूस सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोनिया गांधी यांच्यानंतर ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. बिहारच्या निवडणुका आणि त्यानंतर हैदराबाद महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर UPAच्या अध्यक्षपदी पुन्हा कोण याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. सोनिया गांधी रिटायरमेंट घेतल्यानंतर ही जबाबदारी कोणाकडे द्यायची याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं. मात्र UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यास राहुल गांधी यांनी नकार दिल्याची माहिती मिळाली आहे. खासदार राहुल गांधी यांना नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाला. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार UPAच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर त्यांना पंतप्रधापदाचे उमेदवार व्हावे यासाठी काँग्रेच्या वरिष्ठ नेत्यांनी गळ घातल्याची देखील चर्चा आहे. हे वाचा-भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा थोडक्यात बचावले, तृणमूल कार्यकर्त्यांकडून हल्ला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काहीसा अवकाश असला तरी काँग्रेस आतापासून तयारीला लागलं आहे. 2019मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा चेहरा UPA कडून करण्यात आला होता. मात्र त्या निवडणुकीत काँग्रेसचा धोबीपछाड झाल्यानंतर राहुल गांधी यांनी स्वत: काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत माघार घेतली. त्यानंतर पुन्हा सगळी सूत्र सोनिया गांधींच्या हाती गेली. मधल्या काळात यावरून अनेक वाद आणि गटबाजी देखील झाली पण UPA अध्यक्षपदाची जबाबदारी येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे देण्याबाबत सर्वाचं एकमत होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Congress, Sharad pawar, Sonia gandhi

    पुढील बातम्या