RISING INDIA 2019 : सोनियांनी वाजपेयींना घरी बसवलं - कमलनाथ

RISING INDIA 2019 : सोनियांनी वाजपेयींना घरी बसवलं - कमलनाथ

2004मध्ये कुणाला वाटत होतं का की सोनिया गांधी जिंकतील म्हणून पण त्यांनी त्या वेळी वाजपेयींना हरवलं. आम्हाला 2019बद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे", असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या परिषदेत ते बोलत होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : "2004मध्ये कुणाला वाटत होतं का की सोनिया गांधी जिंकतील म्हणून पण त्यांनी त्या वेळी वाजपेयींना हरवलं. आम्हाला 2019बद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे", असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या परिषदेत ते बोलत होते.

प्रत्येक नव्या आघाताबरोबर भारत कमकुवत न होता उलट अधिकाधिक प्रबळ होत आहे आणि पुलवामा हल्ल्यानंतर विरोध विसरून एकत्र येत निषेध करणाऱ्या भारतीयांनी दाखवून दिलं आहे आणि आता त्यालाच सुसंगत वेगवेगळ्या विचारसरणीचे, वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे तज्ज्ञ, नेते, कलाकार यांना एका मंचावर आणून देशाच्या विकासावर चर्चा घडवून आणायचं काम न्यूज18 नेटवर्क करत आहे.

"56 इंचाची छाती आहे असं सांगणाऱ्यांनी आता पाकिस्तानला कसं उत्तर द्यायचं ते त्यांनी ठरवावं", असं कमलनाथ म्हणाले. भाजपने आम्हाला राष्ट्रवाद शिकवू नये. स्वातंत्र्य चळवळीत भाजप आणि संघाचं योगदान नाही. काँग्रेसने देशासाठी काय नाही केलं... स्वातंत्र्यचळवळीत काँग्रेसच होतं, असं कमलनाथ म्हणाले.

"शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देणं ही त्यांची थट्टा करण्यासारखं आहे. शेतकरी मूर्ख नाही. हे सगळं मतांसाठी सुरू आहे, हे त्यांना कळतं", असं कमलनाथ यांनी सांगितलं.

शेतकरी कर्ज घेतो आणि कर्जातच मरतो. त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून नव्याने सुरूवात झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं, असंही ते म्हणाले.

त्याअगोदरच्या सत्रात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मोदींना पर्याय नसल्याचं सांगितलं. "महाआघाडीकडे आणि कुणीच विरोधकांकडे नेतृत्व करू शकेल असा चेहरा नाही. पंतप्रधानपदी कुणाचा चेहरा आहे तुम्ही सांगा - अखिलेश, मायावती, ममता, शरद पवार ... मला नाही वाटत कुणाकडे जनता त्या अर्थाने पाहू शकते. आमच्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे समर्थ नेतृत्व आहे, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.

उद्घाटनाच्या सत्रात सद्गुरू जग्गी वासुदेव आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी कवी आणि गीतकार प्रसून जोशी यांनी संवाद साधला.

"पाकिस्तान नापाक झालाय, त्याला शुद्ध करायला लागणार आहे. भारत शांतताप्रिय देश आहे. पण कुणी आपले डोळे काढले तर आपल्यालाही दुसऱ्याचे डोळे काढता येतात, हे पंतप्रधान मोदींना सांगायला हवं, असं योगगुरू रामदेव बाबा यांनी सांगितलं. क्रांतीशिवाय क्रांती नाही, असंही ते म्हणाले. न्यूज18 नेटवर्कच्या रायझिंग इंडिया 2019 या शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते बोलत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान नपुंसक आहेत, त्यांना धडा शिकवायला हवा", असंही ते म्हणाले.


<iframe class="video-iframe-bg-color iframe-onload" onload="resizeIframe(this)" id="story-345243" scrolling="no" frameborder="0" width="100%" src="https://lokmat.news18.com/embed/videos/MzQ1MjQz/"></iframe>

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 07:57 PM IST

ताज्या बातम्या