नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांच्यावर नवी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.
सोनिया गांधी यांना संध्याकाळी तातडीने सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज आणि उद्या दोन दिवस दिल्लीत सोनिया गांधी यांच्या सभा होत्या. पण, प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोनिया यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर राहुल आणि प्रियांका गांधी दोघेही रुग्णालयात पोहोचले आहे.
याआधीही सोनिया गांधी यांच्यावर सर गंगाराम रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सोनिया गांधी या हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर होत्या.अचानक पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीतील गंगाराम हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावरून काही काळ दूर झाल्या होत्या. त्यांच्या जागी राहुल गांधी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्विकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांची मनधरणीही करण्यात आली. परंतु, ते आपल्या निर्णयावर ठाम होते. मात्र, काँग्रेसच्या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली होती. काँग्रेस पक्षाची धुरा पुन्हा एकदा हाती स्विकारल्यानंतर सोनिया यांनी पुन्हा एकदा राजकारणात जोमाने सहभागी झाल्या आहे.
Published by:sachin Salve
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.