काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीच, संसदीय दलाच्या बैठकीतला मोठा निर्णय

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधीच, संसदीय दलाच्या बैठकीतला मोठा निर्णय

काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधींबाबतचा मोठा निर्णय

  • Share this:

नवी दिल्ली, 1 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान, काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. काँग्रेसच्या संसदीय दल बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेतेदेखील उपस्थित होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवणाऱ्या मतदारांचे सोनिया गांधी यांनी आभार मानले.

पाहा :VIDEO: मोदींनी सत्ता काबीज केल्यानंतर ओवेसींचा पहिला शाब्दिक हल्ला, म्हणाले...

पाहा :VIDEO: शपथविधीनंतर पहिल्यांदाच बोलले नितीन गडकरी, सांगितलं नवं 'टार्गेट'

गेल्या आठवड्यातच काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवाची पूर्ण जबाबदारी स्वीकारत यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण बैठकीत राहुल यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला, अशी माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुरजेवाला यांनी सांगितले की, 'काँग्रेसनं पक्षानं पराभव स्वीकारला आहे. पण पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच कायम राहतील. पक्षांतर्गत बदल करण्याचे पूर्ण अधिकारी राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत'.

पाहा : VIDEO: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना वाहिली आदरांजली

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ 52 खासदार विजयी झाले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा दर्जा मिळवण्यासाठी एखाद्या पक्षाचे कमीत कमी 55 खासदार असणं गरजेचं आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे केवळ 44 खासदार जिंकले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला दारूण पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत एकट्या भाजपनं 303 जागांवर विजय मिळवत इतिहास रचला आहे.

VIDEO : कोयत्याने सपासप वार, राष्ट्रीय महामार्गावर तरुणाची हत्या

First published: June 1, 2019, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading