नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने आपल्या राजधर्माचे पालन करावं या मागणीसाठी राष्ट्रपतींची भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह, आनंद शर्मा, रणदीप सुरेजवालासह अनेक नेते सहभागी झाले होते. दिल्ली हिंसाचाराबाबत राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्य़ात आले. यानंतर सोनिया गांधी आणि पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या, ‘हिंसाचाराच्यावेळी राज्य व केंद्र सरकार मूकदर्शक बनली होती. हिंसाचारावेळी कुठलीही कारवाई न झाल्याने 35 जणांवर मृत्यू ओढवला.
Sonia Gandhi after submitting a memorandum to President: We call upon you (President) to ensure that life, liberty, & property of citizens are preserved. We also reiterate that you should immediately call for the removal of the Home Minister for his inability to contain violence. https://t.co/fAZURsLu4Tpic.twitter.com/3mlAbzePmz
दिल्लीत राजधर्माच पालन केलं गेलं नाही. त्यामुळे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा.’ यावेळी सोनिया गांधीनी मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. केंद्रसरकारने आपला राजधर्म पाळण्याबाबत अधिक काळजी घ्यायला हवे, असे वक्तव्य मनमोहन सिंह यांनी केले. या हिंसाचारात कोटी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले. सोनिया गांधींनी दिलेल्या मेमॉरेंडममध्ये दिल्ली हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींना कारवाई करण्याची मागणी केली आहे. याशिवाय पीडितांना तत्काळ मदत पुरविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.