मराठी बातम्या /बातम्या /देश /सोनिया गांधींना पत्र लिहिणारी नेता म्हणते; 'विनम्रता गेली खड्ड्यात, मी बोल्ड, सुंदर आणि धाडसी!'

सोनिया गांधींना पत्र लिहिणारी नेता म्हणते; 'विनम्रता गेली खड्ड्यात, मी बोल्ड, सुंदर आणि धाडसी!'

'लोक म्हणतात की मी संधीसाधू आहे, मात्र मी...'

'लोक म्हणतात की मी संधीसाधू आहे, मात्र मी...'

'लोक म्हणतात की मी संधीसाधू आहे, मात्र मी...'

चेन्नई, 13 ऑक्टोबर : काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसला रामराम ठोकला होता. काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन हटविल्यानंतर त्या नाराज होत्या. त्यानंतर त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साधारण एक दशकांपूर्वी राजकारणात आलेल्या खुशबू नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात.

नुकताच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोकळपणाने आपले राजकीय अनुभव व्यक्त केले. मी काँग्रेस सोडलं कारण मी त्यांच्या कार्यप्रणालीमुळे संतुष्ट नव्हते. काँग्रेस पार्टी आता बदलली आहे. पार्टीतील लोकांचे विचारही बदलत आहे. खुशबू म्हणाल्या की, काँग्रेस मला जबाबदारी देण्याची बाब गेल्या चार वर्षांपासून करीत आहे. स्थानिक नेता मला चांगली वागणूक देत नसल्याचे मी त्यांना अनेकदा सांगितलं. मात्र त्यांनी यावर अॅक्शन घेतली नाही.

मी गर्दी जमा करू शकते, मात्र..

खुशबू यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्या नेता नाही एक अभिनेत्री आहे, अशी चर्चा सुरू झाली होती. यावर खुशबू यांनी निराशा व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मी कोणी ऐके काळी अभिनेत्री होते. मात्र तामिळनाडु काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केएस अलागिरी यांना तर कोणी ओळखत नव्हतं. मी गर्दी जमा करू शकते, मात्र मी अलिगिरी नाही. स्त्रियांबद्दलही त्यांचे असेच वर्तन आहे. कोण हुशार आणि वक्तृत्ववान आहे? माझ्यासाठी विनम्रता गेली खड्ड्यात, मी बोल्ड, सुंदर आणि धाडसी आहे.

खुशबू म्हणाल्या की, लोकांची सेवा करा आणि देशासाठी काम करा अशी माझी विचारधारा आहे. लोक मला म्हणतात की मी संधीसाधू आहे. मात्र मी कोणत्याही पार्टीत जाऊन कधी पदासाठी बोलणी केली नाही. त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस मुसलमानासाठी काम करते, मात्र याचा अर्थ असा नाही की ते हिंदूविरोधात आहेत. असंच भाजपसोबतही आहे.

हे ही वाचा-मोठी बातमी! मोबाइल-कार क्षेत्रात मोदी सरकारची नवी योजना; 71000 कोटींची गुंतवणूक

भाजपविरोधात केलं होतं ट्विट

खुशबू यांनी एकेकाळी भाजप विरोधात ट्विट केलं होतं. यावरुनही चर्चा केली जात होती. त्यावर खुशबू म्हणाल्या की, मी भाजप विरोधात सोशल मीडियावर लिहिलं होतं, कारण तेव्हा मी काँग्रेसमध्ये होते. याशिवाय तीन तलाकच्या मुद्द्यावरुन मी पंतप्रधान मोदींचं अभिनंदनही केलं होतं.

First published:

Tags: BJP, Congress, Sonia gandhi, Tamilnadu