राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना टाळलं, मात्र या नेत्याला दिला शपथविधीला उपस्थित राहण्याचा शब्द

राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना टाळलं, मात्र या नेत्याला दिला शपथविधीला उपस्थित राहण्याचा शब्द

शिवसेनेशी युती करण्यास काँग्रेस सुरुवातीला तयार नव्हती. मात्र नंतर शरद पवारांच्या मध्यस्तीनंतर काँग्रेसने तयारी दाखवली होती. मात्र अजुनही काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेशी फारशी जवळीक दाखवत नाहीत.

  • Share this:

नवी दिल्ली 25 डिसेंबर : झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि मित्रपक्षांनी राज्यात भाजपचा पराभव करत बहुमत मिळवलं. त्यामुळे JMMचे नेते हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होणार आहेत. राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि राज्यपालांनीही त्यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केलं. नियोजित मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आता सर्व नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना शपथविधीसाठी निमंत्रित करताहेत. सोरेन यांनी आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केली. या शपथविधी कार्यक्रमाला भाजपविरोधातले अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सोरेन म्हणाले, सोनियाजींना मी शपधविधी कार्यक्रमाचं निमंत्रण दिलंय. त्या कार्यक्रमाला राहुल गांधी नक्की येतील असं आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती सोरेन यांनी दिली.

महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केलं. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी खास दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शपधविधी सोहळ्याला सोनिया आणि राहुल गांधी यांनी उपस्थित राहण्याचं टाळलं होतं.

शिवसेनेशी युती करण्यास काँग्रेस सुरुवातीला तयार नव्हती. मात्र नंतर शरद पवारांच्या मध्यस्तीनंतर काँग्रेसने तयारी दाखवली होती. मात्र अजुनही काँग्रेसचे बडे नेते शिवसेनेशी फारशी जवळीक दाखवत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करणार असल्याचं सोरेन यांनी म्हटलं आहे. 81 जागा असलेल्या झारखंड विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ भाजपचा दारुण पराभव झाला. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीला 47 जागा मिळाल्यात तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावं लागणार अशी चिन्हं आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 25, 2019, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading