EXCLUSIVE महाराष्ट्रात भाकरी फिरणार? शरद पवार-सोनिया गांधी बैठकीत तयार झाला सत्ता स्थापनेचा 'प्लान'

EXCLUSIVE महाराष्ट्रात भाकरी फिरणार? शरद पवार-सोनिया गांधी बैठकीत तयार झाला सत्ता स्थापनेचा 'प्लान'

'News18इंडियाला' विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव देऊ शकतात.

  • Share this:

अरुण कुमार सिंह, नवी दिल्ली 5 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याच्या योजनेवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती 'News18इंडियाला' विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. पवारांनी सोनियांना सत्ता स्थापनेसाठी काय पर्याय असू शकतात आणि त्यासाठी कसं पुढे जायचं याची माहिती सोनियांना दिलीय. यावर सोनिया गांधींनी विचार करून पुन्हा भेटू असं पवारांना सांगितल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगिलंय. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत.

'News18इंडियाला' विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हे शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव देऊ शकतात. शरद पवारांना असं वाटतं की भाजप मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देणार नाही आणि शिवसेना ते सोडायला तयार होणार नाही. उपमुख्यमंत्रिपद शिवसेना स्वीकारण्यास राजी होणार नाही. त्यामुळे सेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्यास शिवसेना तयार होईल अशी शक्यता आहे.

शरद पवार म्हणाले, मी मुख्यमंत्री होणार नाही पण...

असं करायचं असेल तर आधी शिवसेनेने NDA सोबतचे संबंध तोडावे असं सोनिया गांधींना वाटतंय. काँग्रेसला देशव्यापी राजकारण करायचं असल्याने शिवसेनेने कुठल्या मुद्यावर जहाल भूमिका घेऊ नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी असंही सोनियांनी सूचविल्याची माहिती आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल मात्र सरकारमध्ये सामील होणार नाही असंही काँग्रेसने पवारंना सांगितल्याची माहिती 'News18इंडियाला'मिळाली आहे.

महाराष्ट्रात घडणार का राजकीय भूकंप? पवार पुन्हा घेणार सोनियांची भेट

शरद पवार मंगळवारी मुंबईत येणार असून ते यावर शिवसेनेशी बोलणी करून पुन्हा सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत. त्यानंतरच या योजनेवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. भाजप आणि शिवसेनेमधलं चर्चेचं गाडं पुढे गेलं नाही तर ही योजना प्रत्यक्षात येण्यास अडचण येणार नाही.

काय म्हणाले शरद पवार?

सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर पवार म्हणाले, मी सोनियांना महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या अस्थिरता आहे. त्या पार्श्वभूमीवर  आम्ही सगळी चर्चा केली. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला किंवा आम्ही त्यांना कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही. राज्यात भाजपच्या विरोधी वातावरण आहे. शिवसेनेने 170 चा नंबर कुठून आणला ते माहित नाही. आमच्याकडे सत्ता बनविण्यासाठी संख्याबळ नाही. संजय राऊत आमच्याकडे 170चं सख्याबळ असल्याचं सांगत आहेत त्यावर बोलताना पवार म्हणाले त्यांच्याबरोबर बरोबर भाजपचा मोठा गट असावा. मुंबईत मंगळवारी पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार असून त्यानंतर पुन्हा सोनियांशी भेटणार असल्याचंही शरद पवारांनी सांगितलं. पवारांच्या या वक्तव्यामुळे राज्यात नव्या राजकीय चर्चेला सुरुवात होणार आहे.

First published: November 4, 2019, 10:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading