चिदंबरम यांच्या भेटीसाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहार तुरुंगात!

चिदंबरम यांच्या भेटीसाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहार तुरुंगात!

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi)आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी सोमवारी सकाळी तिहार तुरुंगात (Tihar Jail)चिंदबरम यांची भेट घेतली.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर: INX मीडिया प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम (P. Chidambaram)गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. सीबीआय आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. चिदंबरम यांच्या जामीनासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही किंवा इतक्यात त्यांना जामीन मिळण्याची शक्यता दिसत नाही. अशातच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi)आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांनी सोमवारी सकाळी तिहार तुरुंगात (Tihar Jail)चिंदबरम यांची भेट घेतली. याआधी मुलगा कार्ति याने चिदंबरम यांची भेट घेतली होती.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांनी देखील चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी चिदंबरम यांचा मुलगा देखील उपस्थित होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आझाद आणि पटेल यांनी अर्धा तास चिदंबरम यांच्याशी चर्चा केली. देशातील राजकीय परिस्थितती आणि काश्मीर तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आता आज सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी चिदंबरम यांची भेट घेतली.

घटत आहे वजन

दरम्यान चिदंबरम यांची प्रकृती ठीक नसल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. त्यांचे वजन वेगाने घटत आहे. चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाकडे वेळोवेळी मोडिकल सर्व्हिस आणि सप्लिमेंट्री डायड देण्याची मागणी केली आहे. तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चिदंबरम यांना पाठ आणि पोट दुखीचा त्रास होत आहे. यामुळे त्यांना झोप घेता येत नाही.

जामीनावर होणार आज निर्णय

गेल्या गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली होती. आता त्यांच्या जामीन अर्जावर आज म्हणजेच 23 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सीबीआयने 21 ऑगस्ट रोजी चिदंबरम यांना अटक केली होती. सीबीआय आणि ईडीने त्यांच्याविरुद्ध आयएनएक्स मीडिया प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. ज्यावेळी आयएनएक्स मीडिया ग्रुपला 2007मध्ये 305 कोटी रुपयांचा परदेशी निधी मिळाला होता तेव्हा त्याच अनियमितता असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या सर्व काळात चिदंबरम हे अर्थमंत्री होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 09:44 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading