मराठी बातम्या /बातम्या /देश /

सोनभद्रमध्ये जमिनीखाली सापडलेल्या सोन्याच्या साठ्याबद्दल मोठा खुलासा, पुढे आले अनेक दावे

सोनभद्रमध्ये जमिनीखाली सापडलेल्या सोन्याच्या साठ्याबद्दल मोठा खुलासा, पुढे आले अनेक दावे

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये सापडलेल्या सोन्याच्या भांडारामुळे नवनव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या 'सोनपहाडी'चं खरं सत्य समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये सापडलेल्या सोन्याच्या भांडारामुळे नवनव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या 'सोनपहाडी'चं खरं सत्य समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये सापडलेल्या सोन्याच्या भांडारामुळे नवनव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या 'सोनपहाडी'चं खरं सत्य समोर आलं आहे.

  • Published by:  Manoj Khandekar

सोनभद्र, 25 फेब्रुवारी : उत्तर प्रदेशमधील सोनभद्र इथे तब्बल 3000 टन एवढं सोनं सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि हे सोनं इथे कसं, ते कुणाचं की पहिल्यांदाच खाणीत सापडलेलं, याविषयी चर्चा सुरू झाल्या. या कथित सोन्याच्या भांडारामुळे चर्चेत आला उत्तर प्रदेशातला सोनभद्र जिल्हा. सोनभद्रा जिल्हातील सोन्यावरून अनेक कथा समोर आल्या आहेत. चोपन विकास खंडामधील अगोरी गावातील आदिवासी राजा बल शाहचा किल्ला जीर्ण अवस्थेत आहे. या राजानं हा सोन्याचा खजिना लपवल्याचा दावा इथल्या लोकांनी केला आहे. या सोन्याच्या भांडारावरून विविध ऐतिहासिक कथांचा संदर्भ दिला जात आहे. अनेकांनी या सोन्याशी संबंधित अनेक कथा सांगितल्या आहेत.

सोनभद्रमध्ये 3000 टन सोन्याच्या भंडारावर GST चा अजब दावा

इसवी सन ७११ मध्ये आदिवासी राजा बल शाह यांचं राज्य होत. चंदेलमधील काही लोकांनी हा प्रदेश बळकावण्यासाठी हल्ला केला होता. या युद्धामध्ये राजा बल शाहचा पराजय झाला. या पराजयानंतर राजा बल शाह 4000 टन सोनं घेऊन गुप्त रस्त्यानं रेणू नदी पार करून जंगलात लपला. याठिकाणी असलेल्या पहाडीमध्ये राजानं हे सोन लपवल्याचा दावा करण्यात आला आहे.

सोनभद्रामध्ये सोन्याच्या भंडाराचा सर्वे सुरू

राजा बल शाहनं याठिकाणी सोनं लपवल्याच्या दाव्यानंतर या डोंगराला सोन्याची पहाडी म्हटलं जात आहे. याठिकाणी पुरातत्व संशोधन खातं याचा अभ्यास करत आहेत. भारतातील सोन्याच्या पाचपट सोनं सोनभद्रामध्ये असल्याचे दावे केले जात आहेत.  राजा बल शाहने हा सोन्याचा खजिना लपवल्याची माहिती मिळताच त्यावर अनेकांनी हक्क सांगितला आहे. परंतु या ठिकाणी असलेल्या गुहेत राजा बल शाह यांची पत्नी राणी जुरही हिला चंदेल शासकांनी मारलं होतं. या जुगैल जंगलात राणी जुरहीचं जुरही देवी मंदिर देखील आहे. त्यामुळे हा सोन्याचा साठा राजा बल शाह यानंच ठेवल्याचा दावा इथल्या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यानं केला आहे.

नेमकं कुठे आढळलं सोनं?

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील हरदी भागामध्ये ४ हजार टन सोन्याचा साठा असल्याचा दावा करण्यात आला होता. ई-टेंडरिंगच्या माध्यमातून या ब्लॉकचे लिलाव केले जाणार असल्याचंही बोललं जात आहे. यासाठी सरकारने सात सदस्यांची समितीही स्थापन केल्याच्याही जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र असं कोणतंही सोनं आढळला नसल्याचा दावा पीटीआयला दिलेल्या माहितीत सोनभद्र जिल्हा भूगर्भ शास्त्रज्ञांनी केला आहे.

त्यामुळे याठिकाणी नेमकं सोनं आहे का नाही याविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान येथील संशोधनानंतर विविध मुद्दे समोर येतील त्यामुळे काय माहिती समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

-------------------

अन्य बातम्या

घरातच पत्नीसाठी खोदत होते खड्डा, दिवाणखान्यात गाडण्याचा होता प्लॅन, पण...

'माझी पाळी सुरू आहे' असं लिहून स्त्रियांनी केला स्वयंपाक, मंत्रीही जेवले

First published:

Tags: Gold, Uttar pardesh