सोनभद्र हत्याकांड : हॉस्पिटल... धरणं आंदोलन आणि मग प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यापासून रोखण्यात आलं आहे.

  • Share this:

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना सोनभद्र हत्याकांडातील पीडितांना भेटण्यापासून रोखण्यात आलं आहे. शुक्रवारी (19 जुलै)प्रियंका येथे पीडितांची भेट घेण्यासाठी आलेल्या असताना प्रशासनाकडून नारायणपूर पोलीस स्टेशन जवळ त्यांचा ताफा अडवण्यात आला.

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून 9 जणांची हत्या करण्यात आली होती. यानंतर प्रियंका गांधी पीडित कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी येथे आल्या होत्या.

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे जमिनीच्या वादातून 9 जणांची हत्या करण्यात आली होती. यानंतर आज प्रियंका गांधी पीडित कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी येथे आल्या होत्या.

पीडितांची भेट घेण्यापासून रोखल्यानंतर प्रियंका गांधींनी नारायणपूरजवळच धरणं आंदोलन सुरू केलं.

पण पीडितांची भेट घेण्यापासून रोखल्यानंतर प्रियंका गांधींनी नारायणपूरजवळच धरणं आंदोलन सुरू केलं.

'आम्हाला पीडित कुटुंबीयांची भेट घ्यायची आहे. माझ्यासोबत केवळ चार जणच असतील हे सांगितल्यानंतरही प्रशासनानं घटनास्थळावर आम्हाला जाऊ दिलं नाही. आम्हाला का थांबवण्यात येत आहे, याचं उत्तर प्रशासनानं द्यावं', असं म्हणत प्रियंका गांधींनी धरणं आंदोलनास सुरुवात केली.

आंदोलनापूर्वी प्रियंका गांधींनी वाराणसीतील ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन सोनभद्र घटनेत जखमी झालेल्या लोकांची भेट घेतली.

Loading...

यावेळेस जखमींच्या नातेवाईकांनी घडलेला सर्व प्रकार प्रियंका गांधींना सांगितला.

दरम्यान, सोनभद्र घटनेनंतर या परिसरात उत्तर प्रदेश सरकारनं कलम 144 लागू केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 02:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...