संपत्तीसाठी 22 वर्षाच्या पोरानं केली बापाची हत्या; शरीराचे केले तुकडे - तुकडे

संपत्तीसाठी 22 वर्षाच्या पोरानं केली बापाची हत्या; शरीराचे केले तुकडे - तुकडे

वडिलांचा 22 वर्षाच्या मुलानं खून केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे.

  • Share this:

दिल्ली, 22 मे : संपत्तीसाठी 22 वर्षाच्या मुलानं आपल्या वडिलांची हत्या केली. शिवाय, त्यांच्या शरीराचे तुकडे – तुकडे केल्याच्या घटनेनं राजधानी दिल्ली हादरून गेली आहे. शाहदरा परिसरातील फर्श बाजार इथं ही धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या शरीराचे तुकडे करून ते बॅगेत भरून नेत असताना पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. अमन अग्रवाल असं या मुलाचं नाव असून संदेश अग्रवाल ( 48 वर्षे ) असं मृत व्यक्तिचं नाव आहे.  बुधवारी मध्यरात्री 2.30 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. अमन हा एक कॅफे चालवत होता.

वडिलांनी कॉस्मेटिकचं दुकान सुरू केलं होतं. पण अमनला त्या जागी सायबर नेटचं दुकान सुरू करायचं होतं. त्यावरून बाप – लेकात सतत भांडणं व्हायची. त्यानंतर एके दिवशी अमननं वडिलांची चाकूनं भोसकून हत्या केली. वडिलांच्या शरीराचे तुकडे करून चार बॅगांमध्ये भरले. पण, पोलिसांनी त्याला घराच्या बाहेर अटक केली.

शेतकऱ्याची थट्टा; खरीप पिकाच्या अनुदानापोटी खात्यात आले केवळ 4 रूपये!

मृतदेहाची विल्हेवाट लावताना केली अटक

हत्या केल्यानंतर अमन शरीराचे तुकडे करून घेऊन जात होता. त्यावेळी शेजाऱ्यांना शंका आली. पोलिसांनी गाडीची झडती घेतल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. घटना घडली तेव्हा संदेश अग्रवाल यांची पत्नी फिरण्यासाठी कुलू - मनालीला फिरायला गेली होती.

महिन्याभरापूर्वी दिली होती धमकी

या प्रकरणात आता नवीन माहिती देखील समोर येत आहे. मृतकाच्या भाऊ, बहिणीनं सांगितलं की, मुलानं महिन्याभरापूर्वी ठार करण्याची धमकी दिली होती. शिवाय, यामध्ये पत्नी आणि दुसऱ्या मुलांचा देखील सहभाग असल्याचं त्यांनी आपल्या जबाबात म्हटलं आहे. संपत्तीवरून न्यायालयात केस चालू असून त्यावरून सतत भांडणं देखील सुरू होती.

दरम्यान, यापूर्वीच मृतकानं आपलं दुकान पत्नी आणि मुलाच्या नावावर केलं होतं. पण, त्यानंतर देखील सतत भाडणं सुरूच होती. त्यावरून झालेल्या भांडणावरून मुलानं अखेर आपल्या बापाचाच खून केला. समोर आलेल्या माहितीनंतर आता पोलिस या साऱ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासाअंती सर्व घटनेचा नेमका खुलासा होईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

VIDEO : आमदाराच्या हत्येनंतर मोठा उद्रेक, रस्त्यावर उतरून लोकांकडून निषेध

First published: May 22, 2019, 11:46 AM IST
Tags: murder

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading