मुलगा म्हणून कलंक; वडिलांची हत्या करून आईला दिलं पेटवून

मुलानं वडिलांची हत्या केल्यानंतर 75 वर्षाच्या आईला देखील पेटवून देत घरातून पळ काढला.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2019 09:55 AM IST

मुलगा म्हणून कलंक; वडिलांची हत्या करून आईला दिलं पेटवून

भुवनेश्वर, 07 जुलै : ओडिशातील बेलपाडा येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांची हत्या केल्यानंतर आईला देखील पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईला पेटवून दिल्यानंतर या मुलानं घरातून पळ काढला. या घटनेमध्ये आई आणि वडिलांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. घरगुती भाडणं झाली त्यानंतर राग आला म्हणून आपण टोकाचं पाऊल उचलल्याची कबुली या मुलानं दिली पोलिसांना दिली आहे.

Loading...

काय आहे घटना?

ओडिशातील बेलपाडा येथे एक मुलगा आपल्या आई – वडिलांसोबत राहत होता. घरामध्ये जोरदार भांडणं झाली. त्यानंतर मुलानं वडिलांचा खून केला. यावेळी मुलानं पळ काढू नये म्हणून 75 वर्षाच्या आईनं त्याला पकडून ठेवून आई ओरडू लागली. आईच्या ओरडण्यानं लोक गोळा होतील आणि आपण पकडले जाऊ या भीतीपोटी या मुलानं आपल्या आईला देखील पेटवून दिलं. त्यानंतर आरोपी मुलानं घटनास्थळावरून पळ काढला. आरडाओरडा ऐकून लोक गोळा झाले. त्यानंतर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी 75 वर्षाच्या महिलेला रूग्णालयात दाखल केलं. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी मुलाला अटक केली असून त्याला कठोर शिक्षा करा अशी मागणी परिसरातून केली जात आहे.

SPECIAL REPORT: काँग्रेस-JDSचं सरकार अडचणीत; 'ऑपरेशन कमळ' यशस्वी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 7, 2019 09:53 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...