Home /News /national /

कौटुंबिक वादातून मुलाने बापासोबत केलं हे धक्कादायक कृत्य, पोलीस तपासातून माहिती समोर

कौटुंबिक वादातून मुलाने बापासोबत केलं हे धक्कादायक कृत्य, पोलीस तपासातून माहिती समोर

जमीन आणि पत्नीच्या नावावर मृत व्यक्ती कुटुंबात भांडण करायचा. दारू आणि गांजा पिऊन शिवीगाळ करण्यासाठी तो आरोपीच्या घरासमोर पोहोचायचा.

    महासमुंद, 28 जून : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) महासमुंदमध्ये 23 जून रोजी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन (City Kotwali Police Station) हद्दीतील जीवतारा गावात एका 60 वर्षीय व्यक्तीच्या हत्या (Father murder by son) झाली होती. या हत्येचे गूढ पोलिसांनी उकलले असून मृत व्यक्तीचा मुलगा चंदू उर्फ ​​चंदेश्वर याला पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. नेमकी काय आहे घटना - वडिलांची हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह रस्त्यातच सोडून दिल्याचा दावा, पोलिसांनी केला आहे. ही घटना मालमत्तेच्या वादातून घडली आहे. जमीन आणि पत्नीच्या नावावर मृत व्यक्ती कुटुंबात भांडण करायचा. दारू आणि गांजा पिऊन शिवीगाळ करण्यासाठी तो आरोपीच्या घरासमोर पोहोचायचा. आरोपी मुलगा आणि मृताची पत्नी रोजच्या छेडछाडीमुळे अस्वस्थ होते. यातूनच पुढे टोकाचे पाऊल उचलण्यात आले. प्राथमिक चौकशीतच पोलिसांना संशय - कोतवाली पोलिसांनी हत्येतील आरोपी मुलाला अटक करून कलम 302 नुसार अटक केली आहे. सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवतारा गावात २३ जूनच्या मध्यरात्री रिखीराम साहू यांची अज्ञात व्यक्तीने हत्या केली होती. दुसऱ्या दिवशी 24 जून रोजी शहर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून प्रकरणाची दखल घेतली होती. प्राथमिक चौकशीतच पोलिसांना मृताच्या कुटुंबीयांवर संशय आला. रिखीराम साहू या ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह ज्याठिकाणी सापडला त्या ठिकाणापासून काही अंतरावर मृताचा मुलगा दलेश्वर आणि आरोपी लहान मुलगा चंदेश्वर उर्फ ​​चंदू यांचे घर होते. ज्यादिवशी हत्येची घटना घडली त्यादिवशी रिखीराम साहू व्यक्ती त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करताना दिसला होता. हेही वाचा - Mukhtar Ansari in Punjab Jail : बापरे! एका कैद्यासाठी तब्बल 55 लाख खर्च; तुरुंगात नेमकं काय घडतयं? महासमुंदच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक मेघा टेंभुरकर यांनी सांगितले की, मृत व्यक्ती सज्जन होता. त्याचा गावात कोणाशीही वाद नव्हता. तो फक्त पत्नी आणि मुलांशी भांडत असे, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. तर यानंतर पोलिसांनी मृताचा लहान मुलगा आणि मोठ्या मुलाची कसून चौकशी केली असता, लहान मुलाने खुनाची कबुली दिली. यानंतर वडिलांच्या हत्येच्या आरोपाखाली मुलाला अटक करून कलम ३०२ अन्वये न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Chhattisgarh, Crime news, Father, Murder news

    पुढील बातम्या