'आईसाठी योग्य जोडीदार पाहिजे'; मुलाची फेसबुक पोस्ट, नवरदेवासाठी ठेवली एक अट

'आईसाठी योग्य जोडीदार पाहिजे'; मुलाची फेसबुक पोस्ट, नवरदेवासाठी ठेवली एक अट

आईसाठी जोडीदाराच्या शोधतोय मुलगा, नवरदेवासाठी काय आहे अट? वाचा सविस्तर.

  • Share this:

हुगली, 14 नोव्हेंबर: साधारणपणे आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी स्थळ शोधताना वेगवेगळ्या अटी ठेवत असतात. याआधी एका मुलीनं आपल्या आईसाठी स्थळ शोधल्याचीही बातमी मध्यंतरी आली होता. आता एका मुलानं आपल्या आईसाठी स्थळ शोधण्याचा निश्चय केला आहे. योग्य वर मिळण्यासाठी या तरुणानं एक अटही ठेवली आहे. त्याने आपल्या आईचा फोटो आणि आपली अट फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये गौरव अधिकारी नावाच्या तरुणानं आपल्या आईसाठी योग्य वर शोधण्याची एक मोहीमच आखली आहे. त्यासाठी त्याने आपल्या आईचा फोटो आणि संबंधित मचकूर सोशल मीडियावर 3400 वेळा केलाय. त्याची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. आईसाठी योग्य वर निवडताना गौरव यांनी एक अट ठेवली आहे. नेमकी अशी कोणती अट आहे, त्याची का होतेय चर्चा पाहा.

आईसाठी योग्या आणि चांगला जोडीदार पाहिजे...

'फेसबुक पोस्ट लिहिण्याआधी मी आईसोबत चर्चा केली. त्यामधून आई फक्त माझा विचार करत असल्याचं मला कळलं. मग मीही आईचा विचार करायलाच हवा. मी कामानिमित्त सातत्यानं घराबाहेर असते. त्यामुळे आई घरी एकटीच असते. त्यामुळे तिचे सगळे दिवस तिने छान आनंदात आणि सुखात घालवावेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या आईसाठी एक चांगला साथीदार शोधत आहे.'

नवऱ्यामुलासाठी ठेवली अशी अट

'गौरव यांनी Facebook पोस्टमध्ये आपली अट लिहिली आहे. आम्हाला पैसे, संपत्ती, जमीन जुमला यापैकी कशाचाच मोह नाही. जो कोणी वर म्हणून येणार असेल त्याने स्वयंपूर्ण असायला हवं. त्याने माझ्या आईची फुलांसारखी काळजी घ्यायला हवी. आईचा आनंद हा माझा आनंद आहे. पोस्टवर जे लोक हसत आहेत त्यांच्यामुळे मी माझा निर्णय बदलणार नाही. ज्याला ही अट मान्य असेल त्याने संपर्क करावा.'

गौरव अधिकारी हे हुगली जिल्ह्यातील फ्रेंच कॉलनी इथे राहतात. 5 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. गौरव हे त्यांच्या आई-वडिलांचे एकुलतेएक सुपूत्र आहेत. 'कामानिमित्त सतत बाहेर जावं लागत असल्यामुळे त्यांची आई आता घरी एकटीच असते. रात्री कामावरूनही घरी यायला उशीर होतो. त्यामुळे यावेळात आईची काळजी घेणार, तिच्यावर प्रेम करणारा योग्य जोडीदार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं ते म्हणाले.'

First published: November 14, 2019, 2:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading