बकरी ईदसाठी बकऱ्यांना पाजली जात होती बिअर, कॅमेऱ्यात पकडली गेली चोरी

खरंतर या बकऱ्यांना बिअर पाजणाऱ्या या तरुणांना, या घटनेचा व्हिडिओ काढला जात आहे हे माहीत नव्हतं. ते बकऱ्यांना बियर पाजत सुटले होते. जेव्हा त्यांच्यातल्या एका तरुणाचं लक्ष कॅमेऱ्याकडे गेलं तेव्हा त्याने बकऱ्यांना बिअर पाजणं बंद केलं आणि तो तोंड लपवून खालच्या जिन्याकडे जाऊ लागला. बाकीच्या दोघांनी मात्र हे काम सुरूच ठेवलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 06:06 PM IST

बकरी ईदसाठी बकऱ्यांना पाजली जात होती बिअर, कॅमेऱ्यात पकडली गेली चोरी

मेरठ (उत्तर प्रदेश), 6 ऑगस्ट : बकरी ईद जवळ आलं आहे आणि याच बकरी ईदच्या निमित्ताने बकऱ्यांना बियर पाजली जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधल्या मेरठचा आहे. लिसाडी गेटच्या एका तरुणाने हा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये तीन जण घराच्या छतावर बकऱ्यांना आणून त्यांना बिअर पाजताना दिसतायत.व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या या तरुणाने लिहिलं आहे की तो शाहपीर गेटजवळ राहणारा आहे.

कॅमेऱ्यात पकडली गेली चोरी

खरंतर या बकऱ्यांना बिअर पाजणाऱ्या या तरुणांना, या घटनेचा व्हिडिओ काढला जात आहे हे माहीत नव्हतं. ते बकऱ्यांना बियर पाजत सुटले होते. जेव्हा त्यांच्यातल्या एका तरुणाचं लक्ष कॅमेऱ्याकडे गेलं तेव्हा त्याने बकऱ्यांना बिअर पाजणं बंद केलं आणि तो तोंड लपवून खालच्या जिन्याकडे जाऊ लागला. बाकीच्या दोघांनी मात्र हे काम सुरूच ठेवलं.

बॉलिवूड अभिनेता म्हणाला, 'आता काश्मिरी मुलीशी लग्न करेन आणि...'

Loading...

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ज्या बकऱ्यांची ईदला कुर्बानी दिली जाते त्यांना अशा पद्धतीने दारू पाजणं आक्षेपार्ह आहे. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, असंही त्यांचं म्हणणं आहे.

बिअर पाजल्याने वाढतं वजन

बकऱ्यांचं वजन वाढावं आणि ते तंदुरुस्त दिसावेत यासाठी बकऱ्यांना बिअर पाजली जाते. बकऱ्यांच्या तोंडात पाईप घालून त्यांच्या शरीरात पाणीही भरलं जातं. यामुळे ते वजनदार वाटतात. अशा बकऱ्यांची विक्री करून चांगला फायदा मिळतो. त्यामुळे असे प्रकार घडत असतात.

=============================================================================================

VIDEO : लोकसभेत असं काय बोलल्या नवनीत राणा की, अमित शहांनाही आलं हसू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...