लखनऊ 27 मे : उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात जुन्या वैमनस्यातून एक विचित्र पोस्टर वॉर पाहायला मिळालं. येथील तरुणाचं लग्न मोडण्यासाठी संपूर्ण गावात रात्रभर पोस्टर लावण्यात आले. रस्त्यावर आक्षेपार्ह पोस्टर्सही टाकण्यात आले. मात्र, तरुणाचं लग्न तुटण्यापासून वाचलं. आता तरूणानी पोलिसात तक्रार करून याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. गुंडांच्या या कृत्याने पोलीसही हैराण झाले आहेत.
ज्या गावात तरुणाचं लग्न होणार होतं, त्याच गावात गुंडांनी जुन्या वैमनस्यातून तरुणाच्या सासरच्या घराच्या भिंतीवर आक्षेपार्ह पोस्टर चिकटवलं. संपूर्ण गावात हे आक्षेपार्ह पोस्टर टाकण्यात आले, कारण त्यांना या तरुणाचं लग्न मोडायचं होतं. हे संपूर्ण प्रकरण झाशीच्या लाहचुरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे, जिथे एका महिलेनं मौरानीपूर सर्कलच्या सीओला तक्रार पत्र दिलं. पीडित महिलेचे पत्र वाचून पोलीस विभागही गोंधळून गेला.
लग्नाच्या दिवशी नवरी पळाली; नवरदेवाने केलं असं काही की 13 दिवसांनी घरी येत त्याच्यासोबतच केला विवाह
पोस्टर चिकटवून, पॅम्प्लेट वाटून, या व्यक्तीशी लग्न करू नका, असं आवाहन करून वैर दाखवण्याचा हा मार्ग कोणता? हे पोलिसांनाही क्षणभर समजलं नाही. पोस्टरमध्ये लिहिलं होतं, 'या व्यक्तीला एक रूपयाही देऊ नका... ही व्यक्ती लोकांचे पैसे परत करत नाही. पैसे परत मागितल्यावर या व्यक्तीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला'. त्याच्यासोबत लग्न न करण्याचं आवाहन करत तरुणाच्या सासरच्या मंडळींच्या गावात काही पत्रकं टाकून गावातील भिंतींवर पोस्टर चिकटवले गेले.
लहचुरा पोलीस स्टेशन हद्दीतील खंडवागाव येथील रहिवासी माया देवी यांनी सीओ मऊरानीपुर यांना दिलेल्या अर्जात आरोप केला आहे की, भदरवारा गावातील काही लोक 9 मे रोजी पहाटे 4 वाजता तिच्या घरी आले. मारहाण केल्यानंतर मुलगा जयहिंद बद्दल विचारू लागले. भांडणानंतर गुंडांनी तुझ्या मुलाचं जयहिंदचं लग्न कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
एवढंच नाही तर मुलाचं लग्न होऊ नये म्हणून गुंडांनी एकमतानं मुलाच्या सासरच्या घराच्या भिंतींवर आक्षेपार्ह पोस्टर्स लावल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. तसंच आक्षेपार्ह भाषेतील पत्रके लोकांच्या घरासमोर फेकण्यात आली. पोस्टर आणि पॅम्प्लेटमधून नको ते आवाहन करण्यात आलं, त्यामुळे मुलाच्या सासरच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली.
तरुणाच्या सासरच्या मंडळींच्या गावातील भिंतींवर लावलेले पोस्टर्स आणि गावात फेकण्यात आलेले आक्षेपार्ह फलक याबाबत पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली, त्यामुळे तरुणाचं लग्न झालं. मात्र असं असतानाही आरोपीने महिलेच्या मुलीचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ सुरूच ठेवला. दुसरीकडे या संदर्भात एसपी ग्रामीण गोपीनाथ सोनी यांच्याशी बोललं असता त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी योग्य वेळी पोहोचून तरुणाचं लग्न लावून दिलं.
यानंतर एक अर्ज आला आहे, ज्यामध्ये गावातीलच काही लोकांवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत, ज्याचा पोलीस तपास करत आहेत. अर्जात केलेले आरोप खरे ठरले तर पोलीस आरोपींवर कडक कारवाई करतील. कोणत्याही परिस्थितीत भिंतींवर पोस्टर्स चिकटवून किंवा पॅम्प्लेट टाकून आक्षेपार्ह गोष्टी लिहिणे बेकायदेशीर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Local18, Marriage