Research भारतातल्या काही भागात एवढी उष्णता वाढेल की जगणही कठीण होईल

Research भारतातल्या काही भागात एवढी उष्णता वाढेल की जगणही कठीण होईल

या शतकाच्या शेवटपर्यंत पृथ्वीच्या तापमानात 2 ते 4 डिग्री सेल्सीयसची वाढ होणार आहे. प्रचंड प्रदुषणामुळे कार्बनचं उत्सर्जन वाढत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 5 जुलै : भारत दरवर्षी उष्णतेचे नव नवे विक्रम होत आहेत. पारा 49 डिग्री सेल्सीयस पर्यंत जात असल्याने जगणं असह्य झालंय. जगातल्या सर्वाधिक उष्णतेच्या शहरांमध्ये भारताततल्या अनेक शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातलं चंद्रपूर हे शहर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये गणलं जातं. कार्बन उत्सर्जन वाढत असल्याने पृथ्वीचं तापमान येत्या शतकांपर्यंत 2 ते 4 डिग्रीपर्यंत वाढणार अशी भीती व्यक्त केली जातेय. असं तापमान वाढलं तर भारतातल्या काही भागात एवढी उष्णता वाढेल की त्या वातावरणात जगणही कठीण  होईल अशी भीती एका अभ्यासात व्यक्त करण्यात आल्याचं वृत्त CNNने दिलं आहे.

फाशी घेताना दोरी तुटल्याने वाचला जीव, कारंजा शहरातील घटना

कार्बन उत्सर्जन वाढल्याने जगभरातल्याच तापमान वाढ होतेय. फक्त भारतातच नाही तर चीन, ब्राझील, स्पेन, नेपाळ आणि झिबॉम्बे या देशांचाही यात समावेश आहे. Intergovernmental Panel on Climate Change (IPCC) आणि मॅसाच्युसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (MIT) या संस्थांच्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलंय की या शतकाच्या शेवटपर्यंत पृथ्वीच्या तापमानात 2 ते 4 डिग्री सेल्सीयसची वाढ होणार आहे. प्रचंड प्रदुषणामुळे कार्बनचं उत्सर्जन वाढत आहे. नैसर्गिक संपत्तीची बेसुमार लूट सुरू आहे त्यामुळे निसर्गाचा लहरीपणा वाढलाय.

त्यामुळेच युरोपातल्या अनेक देशांमध्येही गेल्या 100 वर्षात पडलं नव्हतं येवढी उष्णता यावर्षी जाणवली. त्यामुळे हा धोक्याचा इशारा असून सर्वांनी मिळून प्रयत्न केले नाहीत तर धोका अटळ आहे असा इशाराही पर्यावरण तज्ज्ञांनी दिलाय.

पाकिस्तानी अँकरला कळला नाही 'Apple'मधला फरक, VIDEO व्हायरल

पॅरिसमध्ये पारा 40 अंशावर

भारतामध्ये पाऊस लांबल्याने पाणीटंचाई आणि उष्णतेच्या झळांना सामोरं जावं लागतं आहे. युरोपमध्येही उष्णतेच्या लाटेचा फटका बसला असून पॅरिसमध्ये तापमान 40 अंशावर पोहोचलं आहे. गेल्या 65 वर्षांतलं हे सर्वाधिक तापमान आहे. फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम या देशांना या उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पण फ्रान्सला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

ऑगस्ट 2003 मध्ये फ्रान्समध्ये अशीच उष्णतेची लाट आली होती. या उष्णतेच्या लाटेत 15 हजार जणांचा बळी गेला होता. त्यावर्षी तापमानाने 44 डिग्रीचा आकडा गाठला होता.

फ्रान्समध्ये या आठवड्यात तरी हे वाढलेलं तापमान खाली येणार नाही, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. रात्रीसुद्धा किमान तापमान 20 अंश सेल्सियसच्या वर राहील, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

First published: July 5, 2019, 10:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading