मराठी बातम्या /बातम्या /देश /

पाकिस्तानात गेलेले अनेक काश्मिरी बेपत्ता, दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचा संशय

पाकिस्तानात गेलेले अनेक काश्मिरी बेपत्ता, दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचा संशय

मागील 3 वर्षात वैध व्हिसा घेऊन कमी काळासाठी पाकिस्तानात गेलेले जवळपास 100 काश्मीरी तरूण (Kashmiri Youths) अजूनही परत आलेले नाहीत. हे तरूण दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याचा सुरक्षा एजन्सींना संशय आहे.

  • Published by:  Kiran Pharate
श्रीनगर 7 फेब्रुवारी : मागील 3 वर्षात वैध व्हिसा घेऊन कमी काळासाठी पाकिस्तानात गेलेले जवळपास 100 काश्मीरी तरूण (Kashmiri Youths) अजूनही परत आलेले नाहीत. यामुळे, सुरक्षा एजन्सी  (Security Agencies) सतर्क झाल्या आहेत. या एजन्सींना असा संशय आहे, की हे युवक सीमेच्या पलिकडील कार्यरत दहशतवादी गटांचे संभाव्य 'स्लीपर सेल्स' आहेत. सुरक्षा एजन्सीच्या विविध अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये उत्तर काश्मीरच्या हंदवाडाच्या सीमाभागातील जंगलात पाच अतिरेकी ठार झाल्यानंतर, या दहशतवाद्यांपैकी एक स्थानिक नागरिक असल्याचं समजलं होतं. हा व्यक्ती 2018 मध्ये पाकिस्तानात गेला होता आणि त्यानंतर तो परत आला नव्हता. त्यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी 1 एप्रिल ते 6 एप्रिल दरम्यान दक्षिण काश्मीरमधील शोपियां, कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यातील तरुणांना घुसखोरी करणाऱ्या  दहशतवाद्यांच्या गटात पाहिलं गेलं होतं. ते सर्व वैध कागदपत्रांसह पाकिस्तानात गेले होते आणि त्यानंतर कधीही परत आले नाहीत. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की वाघा सीमेवरील इमिग्रेशन अधिकारी आणि दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांसह सुरक्षा संस्था तीन वर्षाहून अधिक काळापासून सात दिवसांपेक्षा जास्त काळ वैध व्हिसावर प्रवास करणाऱ्या काश्मीरी तरुणांचा डेटा गोळा करत आहेत. त्यांनी सांगितलं, की यावेळी समोर आलेले आकडे धक्कादायक आहेत. यात असंही समोर आलं आहे, की काही व्यक्ती कधी माघारीच आल्या नाहीत. तर, काही माघारी आले मात्र नंतर गायब झाले. यानंतर ते 'स्लीपर सेल्स' बनले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे, जे  पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय किंवा त्यांच्या मालकांच्या सूचनांची वाट पाहात आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितलं, की याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून परतलेल्या काही तरूणांची त्यांनी चौकशी केली. त्यांना पाकिस्तानात जाण्याचं कारण विचारण्यात आलं. या लोकांशी संबंधित गोष्टींची चौकशी करून त्या तपासल्या गेल्या. त्यांनी सांगितलं, की सुरक्षा एजन्सींचं असं म्हणणं आहे, की नव्या लोकांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्याआधी सहा आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुणांना सहज उपलब्ध होणाऱ्या विस्फोटकांपासून आयईडी बनवण्याची पद्घत एका आठवड्यात शिकवण्यात आली. ते म्हणाले, की बेपत्ता झालेले बहुतेक तरुण हे मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ते काश्मीरमधील दहशतवादाचा नवा चेहरा असल्याचं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं आहे, की ते हत्यारं पोहोचण्यची वाट पाहात आहेत. जे नियंत्रण सीमेवर असणाऱ्या कडक सुरक्षेमुळं पोहोचू शकलेले नाहीत.
First published:

Tags: Jammu and kashmir, Pakistan

पुढील बातम्या