मराठी बातम्या /बातम्या /देश /

सरकारी नोकऱ्यांसाठी आता मुलाखतीचं टेंशन नाही, महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये लागू झाला नियम

सरकारी नोकऱ्यांसाठी आता मुलाखतीचं टेंशन नाही, महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये लागू झाला नियम

जम्मू-कश्मीर आणि लडाखसह 8 केंद्रशासित प्रदेश देशातल्या 28 पैकी 23 राज्यांमध्ये हा निर्णय लागू झाला असून आता या राज्यांमध्ये मुलाखती घेता येणार नाहीत.

  • Published by:  Ajay Kautikwar

नवी दिल्ली 11 ऑक्टोबर: केंद्र सरकारने काही पदांच्या नोकरीसाठी होणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती बंद केल्या आहेत. 23 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा आदेश लागू झाला आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. तृतीय आणि चर्तुथ श्रेणीतल्या नोकऱ्यांसाठी हा नियम लागू झाला आहे. या नियमांचा लाखो तरुणांना फायदा होईल असं मतही सिंह यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात याबाबतची घोषणा केली होती. या घोषणेनंतर कार्मिक मंत्रालयाने सर्व आढावा घेऊन याबाबत एक योजना तयार केली असून त्याची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

तृतीय आणि चर्तुथ श्रेणीतल्या नोकऱ्यांसाठी मुलाखतीची काहीही गरज नाही. याचा ताण उमेदवारांवर येतो आणि त्याच्या तयारीसाठी त्यांना खर्चही करावा लागतो. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

जम्मू-कश्मीर आणि लडाखसह 8 केंद्रशासित प्रदेश देशातल्या 28 पैकी 23 राज्यांमध्ये हा निर्णय लागू झाला असून आता या राज्यांमध्ये मुलाखती घेता येणार नाहीत.

कोरोनाच्या संकटानंतर आधीच अर्थचक्र संथ झालं आहे. त्यात नोकऱ्यांमध्ये कपात होत आहे. तर नव्या नोकऱ्यांची संधीही कमी झालीय. या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा तरुणांना फायदा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

एसटी बसच्या दारातला उभं राहून काढला VIDEO, नवनीत राणा वादात

महाराष्ट्र आणि गुजरातने हा निर्णय अंमलात आणण्यासाठी तत्परता दाखवली होती. मात्र काही राज्ये मुलाखती घेण्यावर ठाम आहे. अनेक राज्यांशी चर्चा केली त्यांच्या शंका दूर केल्या त्यानंतर 28 पैकी 23 राज्यांनी यासाठी होकार दर्शवल्याचंही  केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे.

First published: