OPINION : मोदींना शह देण्यासाठी पक्षाबाहेरच्या नेत्यावर द्या काँग्रेसची मदार, काँग्रेस नेत्यांचा अजब विचार

OPINION : मोदींना शह देण्यासाठी पक्षाबाहेरच्या नेत्यावर द्या काँग्रेसची मदार, काँग्रेस नेत्यांचा अजब विचार

सध्याच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकांमधला सर्वात मह्त्वाचा मुद्दा असतो तो ज्या शक्यता आतापर्यंत पडताळल्या नाहीत त्या पडताळून पाहण्याचा. नरेंद्र मोदींना टक्कर देऊन लढण्याची जबाबदारी कुणा काँग्रेसेतर माणसावर टाकावी का याचाही विचार होतोय.

  • Share this:

रशीद किडवई

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीसोबत जागावाटपामध्ये आलेलं अपयश, उत्तर प्रदेशात महागठबंधनमध्ये न मिळालेलं स्थान  या दोन गोष्टी काँग्रेससाठी खूपच अडचणीच्या ठरल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल म्हणूनच काँग्रेसला भारी पडणार, असं दिसतंय. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप चांगली कामगिरी करेल. त्यामुळे काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हं आहेतच पण त्याशिवाय नेहरू गांधी घराण्याच्या राजकीय अस्तित्वाबदद्लच प्रश्न निर्माण होणार आहेत.

नेहरू - गांधी कुटुंबामध्ये आतापर्यंत कुणीही अपयशी ठरलेलं नाही. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचा पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतच मृत्यू ओढवला होता. तर राजीव गांधींची हत्या झाली तेव्हा तेही निवडणुकीच्या प्रचारातच सक्रिय होते. संजय गांधी यांचा तारुण्यातच मृत्यू ओढवला.

नेहरू-गांधी घराण्याची प्रतिष्ठा जपणार ?

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 2004 आणि 2009 मध्ये दणदणीत विजय मिळवला पण आता नेहरू- गांधी घराण्याची प्रतिष्ठा राखण्याची जबाबादारी प्रियांका आणि राहुल गांधींच्या शिरावर आहे.

प्रियांका गांधींची उत्तर प्रदेशच्या राजकारणातली एंट्री, छोट्याछोट्या पक्षांची मोट बांधून काँग्रेसला जिवंत ठेवण्याचा खटाटोप हे सगळं अस्तित्वाच्या लढाईचंच निदर्शकआहे. काँग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा जरी मिळाल्या तरी ते दुसरा दिवस पाहण्यासाठी पुरेसं आहे. सरकार कोण बनवतं याच्याशीही काँग्रेसला देणंघेणं नाही, सध्या पक्ष वाचवणं हेच मोठं काम आहे.

काँग्रेससारखा जुनाजाणता पक्ष आम आदमी पार्टीशी तडजोडी करण्यात का अयशस्वी ठरला, उत्तर प्रदेशमध्ये महागठबंधनमध्ये काँग्रेस जागा का मिळवू शकली नाही हे एक कोडंच आहे. राजधानीतल्या दोनतीन जागांसाठी काँग्रेसला आपली ओळख पुसून टाकायची नव्हती.  उत्तर प्रदेशमध्येही सपा आणि बसपाच्या महगठनबंधसमोर काँग्रेसचं काही चाललं नाही.

सामान्य माणसाच्या डोळ्यातला अश्रू

1955 च्या काँग्रेस अधिवेशनात यू. एन. ढेबर यांनी म्हटलं होतं, ' काँग्रेस काय आहे ? जीवनातल्या यातना सोसणाऱ्या आणि समृद्ध जगण्याची उमेद बाळगणाऱ्या मानवतेच्या डोळ्यातला काँग्रेस हा अश्रू आहे. '

'याच अश्रूंचा मिळून एक मोठा प्रवाह बनावा,  त्याची नदी व्हावी, त्या नदीचं गंगा, ब्रह्मपुत्रा या महानद्यांमध्ये रुपांतर व्हावं, शतकानुशतकांची पापं त्यात धुवून निघावी, सगळ्या समुदायांना एकत्र आणावं, जीवनाचा नवा हुंकार सर्वांमध्ये चेतवावा हे काँग्रेसचं ध्येय आहे.'

यानंतर अनेक वर्षांनी 1998 मध्ये काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींनी आघाडीसाठी इतर पक्षांना काँग्रेसची द्वारं खुली केली. एकाच पक्षाची महासत्ता असण्याचे दिवस संपले असेच संकेत यातून मिळत होते. केंद्रात सत्तेत यायचं असेल तर प्रादेशिक पक्षांची मोट बांधूनच यावं लागेल हे सोनियांना कळून चुकलं होतं.

लोकसभा निवडणूक 2019 : NDA ला मिळणार का स्पष्ट बहुमत ? सर्व्हेचा अंदाज काय ?

पंचमढीच्या अधिवेशनात काँग्रेसचा भर संकल्पना, धोरणं आणि कार्यक्रमांमध्ये स्थैर्य आणण्यावर होता. याउलट प्रादेशिक पक्ष त्यांच्या स्थानिक, वांशिक आणि भाषिक राजकारणातून वर येत नाहीत, असाही दावा काँग्रेसने केला होता. काँग्रेसचं राजकारण यापेक्षा वरच्या स्तराचं आहे, असं या नेत्यांना म्हणायचं होतं.

घटक पक्षांना घेऊन सरकार चालवणं हा एक टप्पा आहे पण पुढे जाऊन आपलं स्वत:चं असं सरकार बनवायचं आहे हीच त्यांची धारणा होती. 2004 च्या लोकसभा निवडणुकीआधी सोनियांनी राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांशी जागावाटपाचं धोरण ठरवण्यासाठी सिमल्यामध्ये मेळावा भरवला होता. त्यावेळीही या सरकारचं नेतृत्व काँग्रेसनेच करावं, असा आग्रह पक्षातल्या जुन्याजाणत्यांनी धरला होता.

सध्याच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकांमधला सर्वात मह्त्वाचा मुद्दा असतो तो ज्या शक्यता आतापर्यंत पडताळल्या नाहीत त्या पडतळून पाहण्याचा. नरेंद्र मोदींना टक्कर देऊन लढण्याची जबाबदारी कुणा काँग्रेसेतर माणसावर टाकावी का याचाही विचार होतोय.

देशाचं सेवाकेंद्र

या धोरणाला काँग्रेसमधल्या नेत्यांचा पाठिंबा आहे तो दोन कारणांसाठी. या सगळ्या काळात राहुल गांधींना अनुभव मिळवण्यासाठी थोडा वेळ मिळेल. दुसरं कारण म्हणजे ही तिसऱ्या आघाडीतली व्यक्ती एनडीएपासून दूर असलेल्या बिजु जनता दल, वायएसआर काँग्रेस, तेलंगणा राष्ट्रीय समिती यासारख्या पक्षांना एकत्र आणू शकेल.

पण यामुळे काँग्रेस जनतेपासून आणखी दूर जाण्याचा धोका आहे. त्याचबरोबर दलित, अल्पसंख्याक समुदायातला पारंपरिक पाठिंबाही काँग्रेस यामुळे गमावू शकतं. त्यामुळे काँग्रेस नेते खूपच गोंधळलेले आहेत. देशाला आदर्शवाद बहाल करण्यासाठी काँग्रेस हे सेवाकेंद्र आहे, असं सीतारामय्या म्हणाले होते. काँग्रेसने जर मोदींचा विरोधी नेता म्हणून दुसऱ्या कुणावर धुरा सोपवली तर या मूळ धोरणाचं काय होणार, अशी चिंता काही नेत्यांना वाटते आहे. हे सगळं पाहता, या लोकसभा निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसची पुढची मार्गक्रमणा अवलंबून आहे, असंच म्हणावं लागेल.

First published: March 19, 2019, 7:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading