मराठी बातम्या /बातम्या /देश /

आधी हातावर लिहिलं मृत्यूचं कारण, मग जवानाने झाडली स्वतःवर गोळी

आधी हातावर लिहिलं मृत्यूचं कारण, मग जवानाने झाडली स्वतःवर गोळी

योगेश खूप मनमिळाऊ होता आणि त्याचे अजून लग्नही झालेले नव्हते. तर त्याचा मोठा भाऊ आणि मोठ्या बहिणींचे लग्न झाले.

योगेश खूप मनमिळाऊ होता आणि त्याचे अजून लग्नही झालेले नव्हते. तर त्याचा मोठा भाऊ आणि मोठ्या बहिणींचे लग्न झाले.

योगेश खूप मनमिळाऊ होता आणि त्याचे अजून लग्नही झालेले नव्हते. तर त्याचा मोठा भाऊ आणि मोठ्या बहिणींचे लग्न झाले.

    मंडी, 10 ऑगस्ट : हिमाचल प्रदेशमधून सैन्य दलातील एका जवानाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या जवानाचे वय 22 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून या जवानाने आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येआधी या जवानाने आपल्या हातावर काही लिहिले होते, त्यामुळे त्याने आत्महत्या केली का, असा सवालही उपस्थित होत आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - आत्महत्येआधी या जवानाने आपल्या हातावर लिहिले की, "विनोद अक्षय मला माफ कराल. डिंपल तुझा बत्रा तुझ्या मृत्यूची बातमी नाही ऐकू शकत त्यामुळे मीसुद्धा येतोय. आय लव्ह यू डिंपल". मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जम्मू काश्मिरच्या मीरा साहब येथील आहे. योगेश कुमार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. तो हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील पधर तालुक्याच्या सुराहण गावातील रहिवासी आहे. त्याचे वय 22 होते, असे सांगण्यात येत आहे. योगेश कुमारने सोमवारी रात्री 12.30 च्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली. यादरम्यान तो रात्रीच्या ड्युटीवर तैनात होता. गोळीबाराचा आवाज येताच इतर सैनिक तेथे पोहोचले आणि त्याला जवळच्या लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या - या जवानाच्या आत्महत्येमागे प्रेमप्रकरण हे कारण असल्याचे बोलले जात आहे. स्वत: योगेशनेही हातावर असेच काही लिहिले आहे. तरी लोकांना नेमके कारणे शोधता आले नाही. त्याचवेळी, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, योगेश खूप मनमिळाऊ होता आणि त्याचे अजून लग्नही झालेले नव्हते. तर त्याचा मोठा भाऊ आणि मोठ्या बहिणींचे लग्न झाले. ही घटना गावात समजताच पधर परिसरात शोककळा पसरली आहे. हेही वाचा - वितळत्या हिमनदीमुळे उघड झालं 54 वर्षांपूर्वीचं रहस्य, मानवी हाडांसोबत मिळाला विमानाचा सांगाडा तसेच या आत्महत्येच्या घटनेनंतर मृताच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. योगेशने आपल्या कुटुंबीयांना किंवा मित्रांना कोणतीही समस्या सांगितली नव्हती. त्यामुळे त्याने एवढं मोठं पाऊल कसं उचललं याचं सगळ्यांनाच आश्‍चर्य वाटत आहे. त्याचवेळी, लष्करी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नातेवाईक जम्मूला लष्करी रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. येथे मृत जवानाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल. दरम्यान, अशी माहिती मिळाली की, मृताचा मोठा भाऊ धीरज कुमार हा देखील लष्करात कार्यरत असून तो 15 J&K रायफल्समध्ये तैनात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Himachal pradesh, Indian army, Suicide news

    पुढील बातम्या