VIDEO : सुट्टी न मिळाल्यानं पोलिसानं सहकाऱ्यांना ठेवलं ओलिस, छतावरून केला गोळीबार
पोलीस कॉन्स्टेबलने सुट्टी मिळाली नाही म्हणून चक्क सहकाऱ्यांनाच ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. संबंधित पोलिसाला तब्बल तीन तासांनी पकडण्यात यश आलं.
कोलकाता, 23 एप्रिल : पश्चिम बंगालमधील झारग्राम इथं एका पोलिसाने सुट्टी मिळाली नाही म्हणून पोलिस लाईनमध्ये काही सहकाऱ्यांना ओलिस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसाने छतावर चढून तब्बल 50 हून अधिक राऊंड फायर केले. या घटनेची माहिती मिळताच जवळच्याच पोलिस स्टेशनमधील फोर्स आणि कमांडोंचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, फायरिंग करणाऱ्या पोलिसाचे नाव विनोद कुमार आहे. पुरुलिया जिल्ह्यातील असेलल्या या पोलिसाची ड्युटी एसपी ऑफिसमध्ये होती. झारग्राम हा नक्षलग्रस्त भागात असलेला जिल्हा आहे. याला जंगलमहल या नावानेही ओळखलं जातं.
झारग्राम इथल्या पोलिस लाइनमध्ये अचानक गोळीबार सुरू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी इतर कमांडो दाखल झालो. कमांडोंनी उडी मारू छतावर जात त्याला पकडलं.
A junior constable Binod Kumar opens fire at Jhargram Police Line. He has held hostage several male and female officers hostage. The said constable is on the rooftop has already fired 15 rounds and is preventing force from entering the police line. @MamataOfficialpic.twitter.com/FLbHPU3rNz
गोळीबार करणाऱ्या पोलिसाला समजावण्यासाठी जवळपास तीन तास गेले. या तीन तासांमध्ये त्याने 50 हून अधिक राउंड फायर केले. शेवटी त्याला पकडण्यात आलं असून वरिष्ठ अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.