वेणी कापल्याच्या संशयावरुन जवानांना मारहाण

वेणी कापल्याच्या संशयावरुन जवानांना मारहाण

  • Share this:

17 आॅक्टोबर : पुन्हा एकदा सैनिकांना मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा भागात एका महिलेची वेणी कापल्याच्या संशयावरून 4 जवानांना स्थानिकांनी बेदम मारहाण केली.

या घटनेच्या वेळी बचावासाठी आलेल्या स्थानिक पोलिसांना देखील मारहाण करण्यात आली. यात 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या स्थानिक पोलिसांच्या बचावासाठी गेलेल्या सैनिकांनादेखील लोकांनी धक्काबुक्की करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या मंगळवारी ही घटना घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

First published: October 17, 2017, 6:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading