सूर्यग्रहण बघितल्याने मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टीवर 70 टक्के परिणाम

सूर्यग्रहण बघितल्याने मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा, दृष्टीवर 70 टक्के परिणाम

सूर्यग्रहण पाहताना योग्य ती काळजी न घेतल्यानं 14 मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

जयपूर,20 जानेवारी: गेल्या वर्षी 26 डिसेंबर 2019 ला जे सुर्यग्रहण (Solar Eclipse)झालं त्याचा अनेकांनी आनंद घेतला. निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी अनेक खगोलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता होती. विज्ञानाचा हा चमत्कार अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रमांचही आयोजन केल होतं. यामध्ये विशेषत: अनेक शाळांचा समावेश होता. परंतू आता एक धक्कादायक बाब समोर आलीय. सूर्यग्रहण पाहिल्याने अनेक मुलांच्या डोळ्यावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. जवळपास 14 मुलांच्या डोळ्यांना इजा (eye damaged)झाल्याचं समोर आलं आहे.

मुलांच्या डोळ्यांवर उपचार होणं कठीण

26 तारखेला सकाळी 7 वाजून 59 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 35 मिनिटांपर्यंत म्हणजेच एकूण 5 तास 36 मिनिटं हे सूर्यग्रहण होतं. अनेकांनी हे सूर्यग्रहण पाहिलं. मात्र सूर्यग्रहण पाहिल्यामुळे राजास्थानची राजधानी जयपूरमध्ये शाळकरी मुलांच्या डोळ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. इथल्या मुंलांचे डोळे 70 टक्के खराब झाले आहेत. बऱ्याच मुलांनी चष्मा न घालता किंवा कोणतीही काळजी न घेता सूर्यग्रहण पाहिल्याचं समजते. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता सूर्यग्रहण पाहिल्यानंतर काहीवेळातच काही मुलांना थोड्या वेळासाठी डोळ्यांनी दिसणं बंद झालं , तर काहींना डोळ्यांनी अस्पष्ट दिसत होतं. गेल्या 20 दिवसांपासून सवाई मानसिंह रुग्णालयात मुलांच्या डोळ्यांसंदर्भात अनेक तक्रारी आल्या आहेत. शाळेतील मुलांसोबतच काही नागरिकांच्याही डोळ्यांबाबत अशा तक्रारी येत असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं आहे. डोळ्यांच्या तक्रारीपासून मुलांची आणि नागरिकांची सुटका व्हावी आणि त्यांना परत स्पष्ट दिसावं यासाठी सध्या रुग्णालयातील नेत्र विभाग प्रयत्न करत आहे. मात्र, ज्या मुलांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे त्यांची दृष्टी पुन्हा पुर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

डोळ्यातील रेटिनावर गंभीर परिणाम

सध्या रूग्णालयात मुलांवर उपचार सुरू आहेत मात्र डोळ्यातील रेटीनावर फार गंभीर परिणाम झाले.,उपचारानंतरही पहिल्यासारखी दृष्टी मिळणं अशक्य असल्याचं तज्ञांनी म्हटलय. आत्तापर्यंत रुग्णालयात 14 मुलांना दाखल करण्यात आलं आहे. सुर्यग्रहण पाहिल्यामुळे या मुलांच्या डोळ्याचं मोठं नुकसान झालं आहे. या मुलांच्या डोळ्यातील रेटिना 70 टक्के जळला आहे. डोळ्यात पिवळ्या रंगाचा डागही पडला आहे त्यामुळे या मुलांना दिसण्यात अडथळा निर्माण होत आहे. सध्या मुलांवर उपचार सुरू असून राज्यभरातील अनेक ठिकाणांहून डोळ्याची तक्रार घेवून नागरिक रुगाणालयात येत आहेत. मुलांना आणि नागरिकांवर योग्य उपचार होऊन त्यांना दृष्टी परत मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसंच यापुढे ग्रहण बघताना योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

वाच : 'लाथ मारल्यानंतर केस ओढले', कोण आहेत भाजपच्या रॅलीत धक्काबुक्की झालेल्या प्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2020 05:50 PM IST

ताज्या बातम्या