Solar Eclipse 2019 : फक्त सूर्यग्रहण पाहण्यासाठी PM मोदींनी घातला 1.5 लाखांचा चष्मा?

Solar Eclipse 2019 : फक्त सूर्यग्रहण पाहण्यासाठी PM मोदींनी घातला 1.5 लाखांचा चष्मा?

खगोलीय अविष्कार असलेलं हे कंकणाकृती सूर्यग्रहण झाले, 2019मधील हे शेवटचे ग्रहण होते. हा अविष्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 डिसेंबर : खगोलीय अविष्कार असलेलं हे कंकणाकृती सूर्यग्रहण झाले, 2019मधील हे शेवटचे ग्रहण होते. हा अविष्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाहिला. याचे फोटोही त्यांनी ट्विटरवर शेअर केले. मात्र, काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे हे सूर्यग्रहण दिसू शकलं नाही. पंतप्रधान मोदींनीही सूर्यग्रहण पाहिले मात्र ढगाळ वातावरणामुळे सूर्य दिसला नाही.

सूर्यग्रहणाचे काही फोटोही मोदींनी शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदींनी सूर्यग्रहण पाहण्यासाठी लागणारा खास चष्माही घेतला होता. त्याचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो ट्विट करत एका युजरने आता मीम व्हायरल होतील असं म्हटलं. त्याला मोदींनी रिप्लाय दिला. मोदींनी उत्तर देत म्हटलं की, तुमचं स्वागत आहे. एन्जॉय करा. मात्र आता ट्विटरवर ट्रेंड होतोय पंतप्रधान मोदींचा चष्मा.

वाचा-सूर्यग्रहणानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'ढगांमुळे सूर्य दिसला नाही पण...'

वाचा-कंकणाकृती सूर्यग्रहणाला सुरूवात, पाहा खगोलीय अविष्काराचे PHOTO

मोदींनी फक्त सूर्यग्रहण पाहण्यासाठी दीड लाखांचा चष्मा घेतला असल्याचे ट्विटरवर काही युझरने सांगितले. त्यावरून सध्या #BrandedFakeer हा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. या चष्मा जर्मनीचा असून, त्याची किंमत 1.5 लाख रुपये आहे.

तर मोदी समर्थकांनी या चष्म्याची किंमत 3 हजार 664.81-5 हजार 497.57 असल्याचे सांगितले आहे. त्यामुळं मोदींच्या या चष्यामुळे #CoolestPM असा नवा ट्रेंडही होत आहे. त्याचबरोबर मीम्सही शेअर केले जात आहे.

वाचा-सूर्यग्रहण 2019 : तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव

मोदींच्या फोटोचे मीम होतील असे म्हणणाऱ्या युजरचे ट्विट एका तासातच तब्बल 7 हजारहून अनेकांनी रिट्विट केलं आहे. याशिवाय हे ट्विट 30 हजारांहून जास्त जणांनी लाइक केलं आहे तर अडीच हजार युजर्सनी रिप्लाय दिला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून म्हटलं होतं की, भारतातील अनेक लोकांप्रमाणे मी देखील 2019 मधील अखेरचं सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण मला ढगांमुळे सूर्य दिसला नाही पण कोझीकोड आणि इतर भागातील ग्रहणाची दृश्ये लाइव्ह स्ट्रिमिंगवर पाहिली. तज्ज्ञांशी चर्चा करून याबद्दल माहितीदेखील घेतली.

वाचा-राज्यात अनेक भागात पाऊस, ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण दिसण्यात अडथळा

महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असल्याने सूर्यग्रहण दिसण्यात अडथळा निर्माण झाला. तात कर्नाटकतील काही भाग, केरळ आणि तामिळनाडू या दक्षिणेकडच्या राज्यात अरुंद मार्गिकेत हे ग्रहण दिसलं. देशातील काही भागात हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसले. भारताबरोबरच नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, भूतान, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्यास मिळाले. जगात सर्वात आधी दुबईमध्ये आजचे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळालं.

Published by: Priyanka Gawde
First published: December 26, 2019, 5:21 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading