S M L

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं देणार नाव, तावडेंची घोषणा

३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली.

Sonali Deshpande | Updated On: May 20, 2018 12:12 PM IST

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचं देणार नाव, तावडेंची घोषणा

सोलापूर, २० मे : सोलापूर विद्यापीठाचा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठात नामविस्तार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. मंत्रालयात शनिवारी शिवा संघटनेच्यावतीनं वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आणि धनगर समाजाचे प्रतिनिधींच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तावडे यांनी ही माहिती दिलीय.


या बैठकीस धनगर समाज विकासपरिषदेचे अध्यक्ष गणेश हाके, राष्ट्रीय समाज पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले, यशवंत उद्योजकचे अध्यक्ष ललित बंडगर, शिवा महिला आघाडीच्या अध्यक्ष वैशाली लाठे, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवा बिराजदार आदिसह समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Loading...

यावेळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी सामंजस्याने समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्याने तावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार उपसमिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्ताराचा निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री तावडे यांनी यावेळी सांगितले. तसेच, सोलापूर विमानतळास महात्मा बसवेश्वर विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आणि सोलापूर रेल्वे स्टेशनला श्री सिद्धेश्वर रेल्वे टर्मिनस असे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासन रेल्वे प्रशासनास पाठविणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: university
First Published: May 20, 2018 12:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close