हिमाचल प्रदेशात हॉटेलची इमारत कोसळली 7 ठार, 6 जवानांचा समावेश!

हिमाचल प्रदेशमधील सोलन जवळ कुम्हारहट्टी येथे रविवारी रात्री एक हॉटेलची बहुमजली इमारत कोसळून 6 जवानांसह 7 जणांचा मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 09:48 AM IST

हिमाचल प्रदेशात हॉटेलची इमारत कोसळली 7 ठार, 6 जवानांचा समावेश!

सोलन, 15 जुलै: हिमाचल प्रदेशमधील सोलन जवळ कुम्हारहट्टी येथे रविवारी रात्री एक हॉटेलची बहुमजली इमारत कोसळून 6 जवानांसह 7 जणांचा मृत्यू झाला. ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा हॉटलमध्ये 42 जण उपस्थित होते. हॉटेलमध्ये भारतीय लष्कराचे 30 जवान होते. तर अन्य 12 नागरिक होते. घटनेनंतर तातडीने पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 35 लोकांना बाहेर काढण्यात यश आले असून 7 जण अद्याप अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्या खाली अडकलेले सर्व जण जवान असल्याचे बोलले जात आहे.

हिमाचलमधील कुम्हारहट्टी येथे असलेले हॉटेल कोसळले. हे हॉटले ज्या मार्गावर येते तेथून जाताना भारतीय लष्कराचे जवान जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 7 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत आणि ते सर्वजण भारतीय जवान असल्याचे समजते. या परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. NDRFचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आधुनिक यंत्रांच्या मदतीने NDRF बचाव कार्य करत आहे. ढिगाऱ्या खाली अडकलेल्या लोकांपर्यत पोहोचण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

राज्याचे वन मंत्री गोविंद ठाकूर यांनी या घटनेवर दुख: व्यक्त केले आहे. तर मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पुढील काही तासातच बचाव कार्य पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला. या घटनेची चौकशी केली जाईल असे ही ते म्हणाले. बचाव कार्यात NDRFला स्थानिक प्रशासनाची देखील मदत मिळत आहे.

दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2019 09:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...