सॉफ्टवेअर इंजिनिअरनं पत्नीसह 3 मुलांचा केला खून; व्हॉट्सअ‍ॅपवर दिला कबुलीनामा

दिल्लीत सॉफ्टवेअर इंजिनिअरनं पत्नीसह 3 मुलांचा खून केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 10:24 PM IST

सॉफ्टवेअर इंजिनिअरनं पत्नीसह 3 मुलांचा केला खून; व्हॉट्सअ‍ॅपवर दिला कबुलीनामा

नवी दिल्ली, 21 एप्रिल : सॉफ्टवेअर इंजिनिअरनं पत्नीसह 3 मुलांची हत्या केल्यानं दिल्ली हादरून गेली आहे. सुमित इंदिरापुरम असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव आहे. शनिवारी रात्री सुमितनं पत्नी अंशु ( 32 वर्ष ), परमेश ( 5 वर्ष ) आणि आकृती आणि आरव या 4 वर्षाच्या दोन जुळ्या मुलांचा खून केला आहे. शनिवारी रात्री 3 वाजता सुमितनं पत्नी आणि 3 मुलींचा चाकून भोसकून खून केला आहे. त्यानंतर प्लॅट बंद करून सुमित फरार झाला. यानंतर रविवारी संध्याकाळी सहा वाजता सुमितनं कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याबाबती माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली. शिवाय, मी आता आत्महत्या करायला जात असल्याचं देखील सुमितनं म्हटलं आहे. दरम्यान, यानंतर पोलिसांनी सुमितचा शोध घ्यायला सुरूवात केली आहे. पण, सध्या त्याचा मोबाईल बंद लागत आहे.


श्रीलंका स्फोटातल्या मृतांची संख्या 207वर, एका भारतीय महिलेचा समावेश


काय आहे खूनामागचं कारण

Loading...

सुमित इंदिरापुरम हा पेशानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण, त्याची नोकरी सुटली होती. त्यामुळं कुटुंबामध्ये सतत वाद होत होते. त्यातून हा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पोलिस या साऱ्या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासाकरता पोलिसांनी सुमितनं पाठवलेला व्हिडीओ कुटुंबाकडे मागितला आहे. पोलिसांनी सुमितचा शोध घेण्याकरता आपल्या टीम्स देखील रवाना केल्या आहेत. पण, अद्याप देखील त्याचा शोध लागलेला नाही.


VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरच 'या' नेत्याने काढली मित्र पक्षांची लायकी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 10:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...