S M L

पत्नीसह 3 मुलांची हत्या करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर अटकेत

पत्नीसह 3 मुलांची हत्या करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे.

Updated On: Apr 24, 2019 03:28 PM IST

पत्नीसह 3 मुलांची हत्या करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर अटकेत

गाजियाबाद, 24 मार्च : पत्नीसह 3 मुलांची हत्या करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला कर्नाटकमध्ये अटक केली. सुमित इंदिरापुरम असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव आहे. रविवारी उत्तरप्रदेशातील गाजियाबादमध्ये 21 एप्रिल रोजी सुमितनं पत्नीसह 3 मुलांची हत्या केली होती. त्यानंतर कुटुंबाच्या फॅमिलि व्हॉटसग्रुपवर हत्या केल्याचा मेसेज करत सुमितनं मी पण आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. अखेर तीन दिवसानंतर सुमितला कर्नाटकमध्ये अटक करण्यात आली आहे. स़ॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला सुमित मागील काही दिवसापासून बेरोजगार होता. त्यामुळे घरात खटके देखील उडत होते. अखेर शनिवारी रात्री 3 वाजता सुमितनं पत्नीसह 3 मुलांची चाकून भोसकून खून केला होता.


साध्वींची उमेदवारी रद्द झाली तर हा आहे भाजपचा 'प्लॅन बी'पत्नी आणि मुलाची हत्या

शनिवारी रात्री सुमितनं पत्नी अंशु ( 32 वर्ष ), परमेश ( 5 वर्ष ) आणि आकृती आणि आरव या 4 वर्षाच्या दोन जुळ्या मुलांचा खून केला होता. शनिवारी रात्री 3 वाजता सुमितनं पत्नी आणि 3 मुलींचा चाकून भोसकून खून केला. त्यानंतर प्लॅट बंद करून सुमित फरार झाला होता. यानंतर रविवारी संध्याकाळी सहा वाजता सुमितनं कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर त्याबाबती माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली होती. शिवाय, मी आता आत्महत्या करायला जात असल्याचं देखील सुमितनं म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर पोलिसांनी सुमितचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. पण, त्याचा मोबाईल बंद लागत होता.

Loading...


VIDEO: 5 मिनिटांत बातम्यांचा वेगवान आढावा


काय होतं खूनामागचं कारण

सुमित इंदिरापुरम हा पेशानं सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पण, त्याची नोकरी सुटली होती. त्यामुळं कुटुंबामध्ये सतत वाद होत होते. त्यातून हा खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, पोलिस या साऱ्या प्रकरणाचा तपास करत आहे. तपासाकरता पोलिसांनी सुमितनं पाठवलेला व्हिडीओ कुटुंबाकडे मागितला होता. पोलिसांनी सुमितचा शोध घेण्याकरता आपल्या टीम्स देखील रवाना केल्या होत्या. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.


VIDEO : मोदी आमच्याकडे कधी आले? राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावलेल्या कुटुंबाचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 24, 2019 09:11 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close