Home /News /national /

Lockdown: नोकरीवरून काढल्याचा राग, सॉफ्टवेअर इंजिनियरचा सायबर हल्ला; कंपनीचा डेटाच केला Delete

Lockdown: नोकरीवरून काढल्याचा राग, सॉफ्टवेअर इंजिनियरचा सायबर हल्ला; कंपनीचा डेटाच केला Delete

IP Addressवरून पोलिसांनी त्याला शोधून काढलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे.

    नवी दिल्ली 24 जुलै: लॉकडाऊनमुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली. सगळ्याच क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला. अशाच एका सॉफ्टवेअर इंजिअरनेक नोकरी गेल्याने आपल्या पूर्वीच्या कंपनीवर सायबर हल्ला केला. त्यात कंपनीचा महत्त्वाचे डेटाच त्याने डिलीट केल्याने खळबळ उडाली. शेवटी पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली असून त्याच्या कृत्याने पोलिसही चक्रावून गेले आहे. तब्बल 18 हजार रुग्णांचा डेटाच त्याने डिलीट केला आहे. या हॅकरने 18 हजार रुग्णांची माहिती, 3 लाख रुग्णांच्या बिलांची आकडेवारी डिलीट केली आणि 22 हजार रुग्णांच्या खोट्या नावांची एंट्री त्यात केली. त्यामुळे कंपनीला मोठा फटका बसला आहे. विकेश शर्मा असं त्या इंजिनिअरचं नाव आहे. Easy Solutions Private Limited  या कंपनीत तो नोकरीला होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला नोकरी गमवावी लागली. त्याचा राग आल्याने त्याने सायबर हल्ला केला. कंपनीच्या वेबसाईटची माहिती त्याला होती त्यामुळे त्याने हे कृत्य केलं. कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला अटक केली. IP Addressवरून पोलिसांनी त्याला शोधून काढलं. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने आपला गुन्हा मान्य केला आहे. कंपनीने आधी पगार कापला आणि त्यानंतर नोकरी गमवावी लागली. त्यामुळे कंपनील धडा शिकविण्याचा चंगच त्याने बांधला होता. त्याच रागातून त्याने हे कृत्य केल्याने कंपनीला प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. मोठी बातमी: बाईक चालविणाऱ्यांसाठी नवे नियम, जाणून घ्या 5 महत्त्वाच्या गोष्टी दरम्यान,  देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. विविध राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. असं असतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. Babri Demolition Case: CBIच्या कोर्टात लालकृष्ण अडवानींची साक्ष, केला खुलासा देशात मार्च महिन्यापासून दोन महिने लॉडाऊनची स्थिती होती. त्यामुळे उद्योगांना त्याचा जबर फटका बसला आहे. हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर लाखो मजूर शहरातून आपल्या गावाकडे परत गेलेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Lockdown

    पुढील बातम्या