Home /News /national /

Laptop वापरताना सावधान! 80 टक्के होरपळली Software engineer; जीवनमृत्यूशी देतेय झुंज

Laptop वापरताना सावधान! 80 टक्के होरपळली Software engineer; जीवनमृत्यूशी देतेय झुंज

लॅपटॉपचा ब्लास्ट झाल्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या खोलीत आग लागली आणि ती 80 टक्के भाजली असून तिची प्रकृती नाजूक आहे.

    अमरावती, 19 एप्रिल : अद्यापही बरेच लोक वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातून ऑफिस काम करत आहेत. त्यापैकी बहुतेक लोक लॅपटॉपचा वापर करत आहेत. लॅपटॉप म्हटलं की नावाप्रमाणे तो मांडीवर ठेवून त्यावर काम करणं आलं. पण लॅपटॉप असा मांडीवर ठेवून काम करणं किती भयंकर ठरू शकतं, याचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणारी सॉफ्टवेअर इंजिनीअर आज जीवनमृत्यूशी झुंज देते आहे. आंध्र प्रदेशमधील कडापातील कोडुरू मंडलच्या मेकावरिपल्ली गावातील ही घटना (Laptop exploded and Software engineer burn). 23 वर्षांची सुमलता (Sumalatha) बंगळुरूतल्या मॅजिक सोल्युशन्समध्ये काम करते. कोरोना महासाथीमुळे गेल्या काही महिन्यांपासून ती वर्क फ्रॉम होम करत आहे. असंच घरून लॅपटॉपवर काम करत असताना तिच्या लॅपटॉपचा ब्लास्ट झाला आणि संपूर्ण खोलीत आग लागली. आहीत ती 80 टक्के होरपळली आहे. हे वाचा - चमत्कार की नशीब! बंदुकीची गोळी आरपार झाली तरी जवानाला काहीच झालं नाही; Ukrainian Soldier चा Shocking Video तिच्या पालकांनी सांगितलं की, आमच्या मुलीने नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता तिच्या ऑफिसच्या शिफ्टनुसार कामाला सुरुवात केली. ती आपल्या बेडरूममध्ये काम करत होती. लॅपटॉप तिच्या मांडीवर होता आणि अचानक लॅपटॉपचा स्फोट झाला. तिच्या खोलीतून धूर निघत असल्याचं आम्ही पाहिलं आणि आम्ही खोलीत गेलो. ती बेडवर बेशुद्ध पडली होती आणि आगीत पोळली होती. त्यानंतर आम्ही घरातील लाइट बंद केली. सुमलताला सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. तिथं तिला बर्न युनिटमध्ये भरती करण्यात आलं आहे. ती शुद्धीवर आली आहे. पण तिची प्रकृती नाजूक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे हे वाचा - Smartphone मध्ये आग लागण्याची 5 महत्त्वाची कारणं, अशी घ्या काळजी बी कोडुरुचे एसआई नसरीन यांनी सांगितलं की प्रकरणाचा तपास सुरू आहे. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे स्फोट झाला असावा असा संशय पोलिसांना आहे. पण सुमलताच्या कुटुंबातील सदस्यांच्या मते, लॅपटॉपची बॅटरी अधिक गरम झाल्यानेही ब्लास्ट होऊ शकतो. लॅपटॉपमध्ये ब्लास्ट होण्याची कारणे आणि उपाय चार्जिंग पोर्टमध्ये काही समस्या असल्यास, शॉर्ट सर्किटमुळे किंवा जास्त वेळ वापरल्याने लॅपटॉप ओव्हरहिट होतो. लॅपटॉप ओव्हरहिट होऊ नये म्हणून त्यात पंखे असतात. बहुतेक वेळा या पंख्यांचं वेन्ट बंद होतं आणि हवा नीट बाहेर पडत नाही, त्यामुळे लॅपटॉप गरम होतो. अशावेळी लॅपटॉप वापरताना त्याच्या खाली एखादा पॅड ठेवावा जेणेकरून हवा जाण्यासाठी वेंट खुले राहतील. लॅपटॉप जास्त गरम झाल्यानंतर काही वेळ बंद ठेवायलाह हवा. अशी काळजी किंवा खबरदारी घेतल्यास लॅपटॉप स्फोटासारख्या दुर्घटना टाळता येऊ शकतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Andhra pradesh, Lifestyle, Technology

    पुढील बातम्या