Home /News /national /

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डॉक्टरची 'ती' पोस्ट फेक, फॉरवर्ड करण्यापूर्वी वाचा सत्य

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या डॉक्टरची 'ती' पोस्ट फेक, फॉरवर्ड करण्यापूर्वी वाचा सत्य

व्हायरल फोटोमध्ये तरुण डॉक्टर आयशाचा हा शेवटचा फोटो आहे असा दावा करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : कोरोनाचं संकट ओढावल्यापासून सोशल मीडियाचा वापर वाढला आहे असं म्हणायला हरकत नाही. पण या दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी अशी एक बातमी आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला जो पाहिल्यानंतर लोकं भावूक झाली. व्हायरल फोटोमध्ये तरुण डॉक्टर आयशाचा हा शेवटचा फोटो आहे असा दावा करण्यात आला आहे. डॉ. आयशाचा मृत्यू कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. पण ही बातमी फेक असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल बातमीनुसार, डॉ. आयशा खूप हुशार होती ती नुकतीच डॉक्टर बनली होती. कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रूग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनामुळे तिचं निधन झालं. सोशल मीडियावर तिच्या फोटोसह यूजरने डॉ. आयशा हिला श्रद्धांजली वाहिली. ही पोस्ट इतकी व्हायरल झाली की डॉ. आयशा ट्विटरवर ट्रेंड करत होती. या शेवटच्या फोटोमधून आयशाने जगाचा निरोप घेताना ती लोकांसाठी एक संदेश आणि हास्य सोडून गेली असं या पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. तर 17 जुलै रोजी डॉ. आयशाचा वाढदिवस होता, असा दावाही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण ही पोस्ट ज्या अकाऊंटवरून करण्यात आली ते अकाऊंटच फेक असल्याचं समोर आलं आहे. या पोस्टवर लोकांनी भावूक होऊन अनेक कमेंट्स केल्या आहे. पण ही बातमीच खोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या