'येति लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आला होता'

येतिबद्दल आता सोशल मीडियावर मजेशीर ट्विट, प्रतिक्रिया वाचालया मिळत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 03:54 PM IST

'येति लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी आला होता'

मुंबई, 30 एप्रिल : हिममानव पाहिल्याचं अनेकांनी म्हटलं मात्र याबाबत कोणतेही पुरावे आजपर्यंत मिळू शकलेला नाहीत. आता भारतीय लष्कराने हिममानवाच्या अस्तित्वाचा दावा केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय लष्कराच्या ट्विटरवरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. यात बर्फावर मोठ्या आकाराचे पावलाचे ठसे दिसतात. हा हिममानव असल्याचा दावा भारतीय सैन्यदलाकडून ट्विटरवर करण्यात आला आहे. भारतीय लष्करातील गिर्यारोहणासाठी गेलेल्या पथकाला 9 एप्रिल 2019 ला मकालू बेस कॅम्पजवळ 32 बाय 15 इंचाचे हे ठसे दिसले असं सैन्यानं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. हिममानव यापूर्वी पहिल्यांदा मकालू-बरून नॅशनल पार्कमध्ये दिसला होता. भारतीय सैन्याच्या दाव्यानंतर आता सोशल मीडियावर देखील चर्चांना उधाण आलं आहे. काही जण यावर अत्यंत मजेशीरपणे आपली मतं मांडताना दिसत आहेत. काहींनी तर असं ट्विट केलं की, येति हा लोकसभा निवडणुकीकरता मतदान करण्यासाठी आला होता. अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया तुम्हाला सोशल मीडियावर पाहायाला मिळतील.Loading...


येतिबद्दल सध्या मतमतांतरं आहेत. पण, भारतीय लष्कराच्या ट्विटनं पुन्हा एकदा चर्चांना सुरूवात झाली आहे.


हिममानव खरंच आहे का? सैन्यदलानं ट्विट केलेलं फोटो काय सांगतात पाहा SPECIAL REPORT


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2019 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...