नवी दिल्ली, 24 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. आता हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रश्न राहिला नसून आता 2034 पर्यंत राहूल गांधी हे दूर ढकलले गेले आहे. पण राहुल गांधी यांच्यापुढे एकच पर्याय आहे. जर या प्रकरणात सुरत न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर ते लोकसभेची जागा लढवू शकतील.
राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेनुसार, 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. पण ते काही लगेच तुरुगांत जाणार नाही. कारण या निकालाविरुद्ध अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांचा जामीन मिळाला आहे. दोषी ठरल्यामुळे ते आजपासून लोकसभेच्या सदस्यत्वासाठी ते अपात्र ठरले आहे.
मुळात हे संसदेच्या कायद्यानुसार आहे. या प्रकरणात प्रकरणात दोन वर्षे शिक्षा भोगल्यानंतर आणखी 6 वर्षांच्या शिक्षेची सुद्धा यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या अपात्रतेला आठ वर्षे पूर्ण होऊ शकतात. पण राहुल गांधी हे वरच्या कोर्टातमध्ये जातील. त्यांना हा दावा खोडून काढावा लागेल आणि ही केस जिंकावी लागेल. त्यामुळे त्यांच्यावर केलेली अपात्रतेची कारवाई रद्द होईल.
राहुल गांधी हे सध्या 52 वर्षांचे आहेत. जर ते दोषी ठरले तर अपात्रतेता कायम राहिली. त्यामुळे ते 2024 ची लोकसभा निवडणुकीत नक्कीच लढू शकणार नाही. याआधी ते 2029 च्या निवडणुकीमध्ये ते विरोधी बाकावर बसले होते. त्यामुळे त्यांना थेट 2034 च्या लोकसभा निवडणुकीतच पुन्हा एकदा उतरण्याची संधी मिळेल.
राहुल गांधी यांना तरुण नेता म्हणून ओळखले जातात. पण ते जेव्हा निवडणूक लढवतील ते 63 वर्षांचे असणार आहे. 1981 मध्ये इंदिरा गांधींनी ‘गरीबी हटाओ’ चा नारा देऊन त्यांनी पुनरागमन केलं होतं. इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या तेव्हा 49 वर्षांच्या होत्या.
राहुल गांधी अशा प्रकारे काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या शर्यतीतून किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कोणत्याही विरोधी पक्षाच्या आणि अर्थातच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. आता काँग्रेसमधील परिस्थितीत पाहिली तर गांधींच्या नेतृत्वाविरुद्ध बंडखोरी झाली नाही.
गुलाम नबी आझाद बाहेर आहेत. सचिन पायलट यांचं सुद्ध तळ्यातमळ्यात आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे पक्ष कधीच सोडून गेले आणि भाजपमध्ये सामील झाले. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाबचे काय झाले ते सर्वांनाच माहिती आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं काय झालं, हे सर्वश्रूत असून यादी मोठी आहे.
काँग्रेस हायकमांडने निष्ठावंत मल्लिकार्जुन खर्गे यांना पक्षाच्या निवडणुकीत पक्षाध्यक्षपदी बसवले. त्यांच्यामुळे शशी थरूर हे कमालीचे नाराज आहे. त्यातच आता राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली आहे. त्यामुळे पक्षाअंतर्गत कारवाया वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि हायकमांडविरोधात असलेली नाराजी उफाळून येण्याची चिन्ह आहे. त्यामुळे काही नेते हे बाहेर पडण्याची चर्चाही रंगली आहे. त्यातच एक उदाहरण म्हणजे, सचिन पायलट आहे ते 2034 मध्ये 55 वर्षांचे असणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये आगामी काळात काय काय घडणार हे पाहण्याचे ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress, Rahul gandhi