मतमोजणी दिवशी झाला मुलाचा जन्म, नाव ठेवले...

पंतप्रधान मोदींचे धोरण आणि कार्यक्रमापासून प्रभावित झालेल्या एका कुटुंबाने आपल्या मुलाचे नावच मोदींच्या नावावर ठेवले आहे.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 08:23 AM IST

मतमोजणी दिवशी झाला मुलाचा जन्म, नाव ठेवले...

लखनऊ, 26 मे: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने ऐतिहासिक असा विजय मिळवला. 23 मे रोजी जाहीर झालेल्या निकालानंतर आता मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. पंतप्रधान मोदींचे धोरण आणि कार्यक्रमापासून प्रभावित झालेल्या एका कुटुंबाने आपल्या मुलाचे नावच मोदींच्या नावावर ठेवले आहे.

उत्तर प्रदेशमधील गोंडा येथील एका मुस्लिम कुटुंबात 23 मे रोजी मुलाचा जन्म झाला. वजीरगंज येथील परसापूरमधील मोहम्मद इदरीश आणि मैनाज बेगम यांना मतमोजणीच्या दिवशीच मुलगा झाला आणि त्यानंतर चर्चा सुरु झाली ती मुलाचे नाव काय ठेवायचे याची. मुलाचे नाव नरेंद्र दामोदर दास मोदी ठेवायचे असा हट्ट आईने धरला. यावर कुटुंबातील अन्य सदस्यांनी मैनाज बेगम यांना समजवण्याचा प्रयत्न केला. यासाठी दुबईत नोकरी करणाऱ्या पती मोहम्मद इदरीश यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाली.सर्वांनी सांगितल्यानंतर ही बाळाच्या आईने नावासाठी हट्ट धरल्यामुळे अखेर कुटुंबीयांनी मोदी नाव ठेवण्यास मंजूरी दिली. यासंदर्भातील जन्म दाखला ग्राम पंचायतीकडे पाठवला आहे. नरेंद्र मोदी देशाचे चांगले नेते आहेत. उज्ज्वला योजना, जनधन खाते, अशा अनेक योजनांमुळे फायदा झाल्याचे मैनाज बेगम यांनी सांगितले. तिहेरी तलाक संदर्भात कायदा करुन मुस्लिम महिलांना मोठा दिलासा दिल्याचे त्या म्हणाल्या.

Loading...


मोदींनी नवनिर्वाचित खासदारांना काय दिला सल्ला? या आणि इतर महत्त्वपूर्ण 18 घडामोडी, पाहा VIDEOबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 08:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...