Home /News /national /

सर्पदंश झाला बायकोला आणि सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला नवरा

सर्पदंश झाला बायकोला आणि सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला नवरा

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

सर्पदंशामुळे बायको ओरडत होती आणि नवऱ्याने सापाला पकडून रुग्णालयाकडे धाव घेतली.

    लखनऊ, 24 जून : एखाद्याला साप चावला की त्या व्यक्तीला वाचवण्याची धडपड होते. पण सध्या एक असं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका व्यक्तीने त्याच्या बायकोला साप चावताच सापाला घेऊन तो रुग्णालयात पोहोचला. सर्पदंशामुळे बायको वेदनेने किंचाळत होती आणि नवऱ्याने सापाला जिवंत पकडलं आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. उत्तर प्रदेशमधील हे प्रकरण आहे (Snakebitten wife husband take snake to hospital). उन्नावच्या अफजाल नगरमध्ये राहणारा रामेंद्र यादव, ज्याच्या बायकोला सकाळी साप चावला. काहीतरी चावल्यासारखं वाटलं आणि त्यानंतर तिला वेदना होत होत्या. त्यानंतर तिने तिथं सापाला पाहिलं आणि तिला घामच फुटला. ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून तिचा नवरा आणि घरातील इतर लोक धावत आले. सापाला पाहून तेसुद्धा घाबरले. महिलेच्या नवऱ्याने सापाला पकडलं आणि एका बाटलीत बंद केलं. त्यानंतर तो बायकोला घेऊन त्याने तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली पण हॉस्पिलला जाताना त्याने बाटली बंद केलेल्या सापालाही सोबत घेतलं. हे वाचा - आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO रामेंद्रला सापाला हॉस्पिटलमध्ये का आणलं असं विचारलं तेव्हा त्याने सांहितलं, साप चावल्याच्या अशा प्रकरणात ग्रामस्थांसोबत मी याआधी रुग्णालयात आलो आहे. त्यावेळी डॉक्टरांनी कोणता साप चावला असं विचारलं होतं. कोणत्या सापाने दंश केला हे समजल्यानंतरच डॉक्टर इंजेक्शन देतात. बहुतेकांना साप कोणता होता हे माहिती नसतं त्यामुळे काही लोकांचा उपचार न मिळाल्याने जीवही जातो. त्यामुळेच मी माझ्या पत्नीला साप चावताच तिच्यासह तिला डसणाऱ्या सापालाही सोबत घेऊन आलो. हे वाचा - Shocking! नाश्ता असो वा जेवण... फक्त Dog food खात राहिला तरुण शेवटी... आज तकच्या वृत्तानुसार या प्रकरणात सीएमएसने सांगितलं की महिलेच्या पतीने सापालाही सोबत आणलं होतं, यामुळे डॉक्टरांना उपचार करणं सोपं झालं. कारण साप विषारी आहे की नाही हे आम्हाला समजलं. आता महिलेची प्रकृती ठिक आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Snake, Uttar pradesh

    पुढील बातम्या