Home /News /national /

आजोबा-नातवाला चावला साप; रुग्णालयात नेताच असं काही घडलं की भीतीने रुग्णांसह कर्मचारीही पळाले

आजोबा-नातवाला चावला साप; रुग्णालयात नेताच असं काही घडलं की भीतीने रुग्णांसह कर्मचारीही पळाले

Snake bites grandfather grandson : आजोबा-नातवाला घेऊन कुटुंब रुग्णालयात पोहोचलं आणि रुग्णालयातील सर्वांना घाम फुटला.

    पाटणा, 28 जून : साप चावल्याची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण सध्या एक असं प्रकरण चर्चेत आलं आहे, ज्याने रुग्णालय हादरवून सोडलं. आजोबा-नातवाला साप चावला (Snake bite news). त्यानंतर त्यांच्या कुटुंबाने त्यांना रुग्णालयात नेलं. हॉस्पिटलमध्ये जाताच असं काही घडलं की भीतीने रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचारी पळू लागले.  बिहारमधील ही घटना आहे (Snake bites grandfather grandson). गोपालगंज जिल्ह्याच्या लढवार गावातील 4 वर्षांचा हार्दिक कुमार आणि त्याचे आजोबा रामाशीष पंडित यांना सापाने दंश केला. कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार मुलगा घराच्या दरवाजाजवळ खेळत होता. त्यावेळी त्याला साप चावला. नातवाला  सापापासून वाचवण्यासाठी त्याचे आजोबा गेले, तेव्हा त्यांनाही सापाने दंश केला. त्यांच्या कुटुंबाने तात्काळ त्यांना रुग्णालयात नेलं. पण त्यांना रुग्णालयात नेताच रुग्णालयातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना घाम फुटला आणि ते भीतीने पळून लागले. याचं कारण म्हणजे या कुटुंबाने त्यांच्यासोबत सापही आणला होता. रुग्णालयात येताच त्यांनी पिशवीतून साप बाहेर काढला आणि सर्वांच्या तोंडचं पाणी पळालं. कुटुंबाच्या मते, त्यांनी सापाला आपल्यासोबत आणलं जेणेकरून या दोघांनाही चावलेला साप कोणता आहे याची माहिती डॉक्टरांना मिळेल. हे वाचा - आश्चर्य! 4 वर्षांच्या चिमुकल्याला चावताच कोब्राचा तडफडून मृत्यू, मुलगा मात्र ठणठणीत; पाहा VIDEO पण ज्या सापाला पाहून घाबरून सर्वजण पळत होत तो खरंतर मृत होता. कुटुंबाने सांगितल्यानुसार आजोबा-नातवाला साप डसताच आजूबाजूला असलेले लोक लाठी-काठ्या घेऊन आले आणि त्यांनी सापावर हल्ला केला. त्यांनी सापाला मारलं आणि त्यानंतर रुग्णालयात आणलं. साप मृत आहे हे जेव्हा समजलं तेव्हा कुठे रुग्णालयात सर्वांच्या जीवात जीव आला. आता आजोबा आणि नातू दोघंही ठिक आहेत, त्यांना कोणताही धोका नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सर्पदंश झाला बायकोला आणि सापाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला नवरा काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्येही एका व्यक्तीच्या बायकोला साप चावताच त्याने बायकोसह सापालाही रुग्णालयात नेलं. रामेंद्र यादव असं या व्यक्तीचं नाव. त्याच्या बायकोला सापाने दंश करताच त्याने सापाला पकडलं आणि एका बाटलीत बंद केलं. त्यानंतर तो बायकोला घेऊन त्याने तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली पण हॉस्पिलला जाताना त्याने बाटली बंद केलेल्या सापालाही सोबत घेतलं. हे वाचा - बापरे! गाईला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढण्यासाठी सिंहाशीही भिडला तरुण, धक्कादायक शेवट; पाहा VIDEO आज तकच्या वृत्तानुसार रामेंद्रला सापाला हॉस्पिटलमध्ये का आणलं असं विचारलं तेव्हा त्याने सांहितलं, साप चावल्याच्या अशा प्रकरणात ग्रामस्थांसोबत मी याआधी रुग्णालयात आलो आहे. त्यावेळी डॉक्टरांनी कोणता साप चावला असं विचारलं होतं. कोणत्या सापाने दंश केला हे समजल्यानंतरच डॉक्टर इंजेक्शन देतात. बहुतेकांना साप कोणता होता हे माहिती नसतं त्यामुळे काही लोकांचा उपचार न मिळाल्याने जीवही जातो. त्यामुळेच मी माझ्या पत्नीला साप चावताच तिच्यासह तिला डसणाऱ्या सापालाही सोबत घेऊन आलो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bihar, Snake

    पुढील बातम्या