स्मृती इराणी यांच्या संपत्तीत का झाली घट? उमेदवारी अर्जात नेमकं आहे काय ?

स्मृती इराणी यांच्या संपत्तीत का झाली घट? उमेदवारी अर्जात नेमकं आहे काय ?

स्मृती इराणींनी उमेदवारी अर्जात दिलेल्या माहितीनुसार, 2016-17 मध्ये त्यांची संपत्ती एक कोटीच्या वर होती. पण आता मात्र त्यात घट होऊन ती 46 लाख रुपयांवर आली आहे.

  • Share this:

अमेठी, 11 एप्रिल : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज भरला. त्या अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी रोड शो आणि पूजाअर्जा करून त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं.

उमेदवारी अर्ज भरताना संपत्ती जाहीर करावी लागते. स्मृती इराणींनीही यावेळी आपली संपत्ती जाहीर केली. यानुसार त्यांची संपत्ती 60 लाख रुपयांनी घटली आहे.उमेदवारी अर्जात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2016-17 मध्ये त्यांची संपत्ती एक कोटीच्या वर होती. पण आता मात्र त्यात घट होऊन ती 46 लाख रुपयांवर आली आहे.

आपल्याविरुद्ध कोणताही खटला दाखल नाही,असं त्यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच आपल्याकडे ३ कोटींची स्थावर मालमत्ता आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

'राहुल यांनी केलं पलायन'

उत्तर प्रदेशातल्या अमेठीमध्ये 6 मे ला मतदान होणार आहे. स्मृती इराणी यांची लढत पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याशी आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांचा पराभव झाला होता. यावेळी मात्र स्मृती इराणी अधिक ताकद लावून निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधींनी केरळमधल्या वायनाडमधून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा राहुल यांनी अमेठीतून पलायन केलं, अशी टीका स्मृती इराणी यांनी केली होती.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये स्मृती इराणी यांच्याकडे आधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय होतं. त्यानंतर त्यांच्याकडे वस्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन आता पुन्हा एकदा त्या लोकसभा लढवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

मागच्या पाच वर्षांत त्यांनी अमेठीमध्ये दौरे करून आपला मतदारसंघ बांधण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांना आता त्या किती टक्कर देतात ते पाहावं लागेल.

==========================================================================================================================================================

VIDEO: अमोल कोल्हे यांचा हमीभाव मिळवून देणारा 'शेतकरी अजेंडा'

First published: April 11, 2019, 6:24 PM IST

ताज्या बातम्या