PHOTO: लोकशाहीच्या यज्ञासाठी 'या' नेत्यांचं खरंखुरं होमहवन

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी (शुक्रवारी)उत्साहात पार पडलं. मात्र अजून 6 टप्प्यातील मतदान बाकी आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी यज्ञयाग करण्यात आले आहेत.

  • Share this:

लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरात पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडलं. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले गणरायाचरणी नतमस्तक झाले. टेकडी गणेश मंदिरात गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन नाना पटोले यांनी मतदान केलं. नागपुरात नाना पटोले विरूद्ध नितीन गडकरी अशा चुरशीची लढत आहे.

लोकसभा निवडणूक 2019 ची निवडणूक एकूण 7 टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचं मतदान नुकतच पार पडलं. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उमेदवारी अर्ज भरण्याआधी देवाचरणी लीन.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी भाजप कार्यालयात होमहवन केलं. यावेळी त्यांचे पती जुबीन इराणीही उपस्थित होते. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाजपकडून 11 एप्रिलला (गुरूवारी) अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना स्मृती इराणी यांच्यासोबत योगी आदित्यनाथही उपस्थित होते. अमेठीत लोकसभा निवडणुकीसाठी स्मृती इराणी विरूद्ध राहुल गांधी अशी लढत असणार आहे.

स्मृती ईराणी यांच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये सोनिया गांधी यांनीही रायबरेली इथे यज्ञ करून प्रार्थना केली आहे. यज्ञादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्राही उपस्थित होत्या.

2004 पासून रायबरेली मतदारसंघातून सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठीही रायबरेलीमधून सोनिया गांधी यांनी 11 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. रायबरेलीमधून भाजपचे दिनेश प्रताप विरूद्ध सोनिया गांधी अशी लढत असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या