स्मृती इराणींच्या त्या पीएफ सर्टिफिकेटचा होणार लिलाव

स्मृती इराणींच्या त्या पीएफ सर्टिफिकेटचा होणार लिलाव

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आता महिला आणि बालकल्याण खात्याचा कार्यभार स्वीकारला आहे. आता स्मृती इराणी यांच्या एका पीएफ सर्टिफिकेटचा लिलाव होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 4 जून : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आता महिला आणि बालकल्याण खात्याचा कार्यभार स्वीकारला आहे. या निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्या यशाची चर्चा सगळीकडे आहे.

याआधी विरोधकांनी त्यांच्या शिक्षणाच्या प्रमाणपत्रावरून त्यांच्यावर आरोप केले होते. आता स्मृती इराणी यांचं आणखी एक सर्टिफिकेट चर्चेत आलं आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्मृती इराणी यांना मुंबईमध्ये बांद्र्याच्या मॅकडोनल्डमध्ये काम करावं लागलं होतं.

मॅकडोनल्डमध्ये काम

हे काम करताना स्मृती इराणी यांच्या प्रॉव्हिडंट फंडचे पैसे कापून जात होते. त्या पीएफ सर्टिफिकेटचा आता लिलाव होणार आहे. या लिलावातून जे पैसे मिळणार आहेत ते महिला कारागीरांच्या गटाला निधी म्हणून दिले जातील.

स्मृती इराणी यांनी स्ट्रगलच्या काळात मॅकडोनल्डमध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्यांना टीव्ही मालिकांमध्ये ब्रेक मिळाला. स्मृती इराणी यांची 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका प्रचंड गाजली. त्यांना या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. स्मृती इराणी यांनी अमेठीमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्या केंद्रात मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या.

सर्टिफिकेटचा लिलाव

स्मृती इराणी यांनी मॅकडोनल्डमधून त्यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे परत काढून घेतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये ते पैसे तसेच राहिले. आता याच सर्टिफिकेटचा लिलाव होणार आहे.

स्मृती इराणी यांचं हे सर्टिफिकेट मुंबईमधल्या टेक्स्टाइल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे एक सदस्य शोधत होते. या लिलावाचं आयोजनही द कॉटन टेक्सटाइल्स एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलतर्फे करण्यात येणार आहे.

======================================================================================

VIDEO : पेट्रोल पंपावर तरुणीची हायहोल्टेज ड्रामा, सांगितलं स्वत:ला आमदाराची गर्लफ्रेंड!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 4, 2019 06:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading