CBSE दहावी : आईचा परीक्षेच्या दिवशीच मुलीचा निकाल

CBSE दहावी : आईचा परीक्षेच्या दिवशीच मुलीचा निकाल

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीची परीक्षा देत आहेत. अमेठीमधल्या या प्रतिष्ठेच्या लढतीचा निकाल 23 मे ला आहे. पण त्यााधीच CBSE परीक्षेचा दहावीचा निकाल आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 3 मे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीची परीक्षा देत आहेत. अमेठीमधल्या या प्रतिष्ठेच्या लढतीचा निकाल 23 मे ला आहे. पण त्यााधीच CBSE परीक्षेचा दहावीचा निकाल आला आहे. या परीक्षेत स्मृती इराणी यांची मुलगी जोईश हिने 82 % गुण मिळवले. याबद्दल स्मृती इराणी यांनी ट्वीट करून मुलीचं अभिनंदन केलं आहे.

अडचणींवर मात करून माझ्या मुलीने चांगलं यश मिळवलं याचा मला अभिमान आहे, असं स्मृती इराणी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमेठीमध्ये आज मतदान होतं आहे आणि निकाल तर थेट 23 मे ला लागणार आहे. पण त्याआधीच लागलेल्या या निकालामुळे त्या चांगल्याच खूश झाल्या.

जोहरला 91 %

स्मृती इराणींचा मुलगा जोहरनेही सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षेत 91 टक्के गुण मिळवत चांगलं यश संपादन केलं आहे. मुलांच्या या यशाबद्दल अर्थातच स्मृती इराणी यांना समाधान आहे.

स्मृती इराणी यांनी आपल्या मुलाच्या यशाचा आनंद सगळ्यांशी शेअर करत म्हटलं होतं, 'माझा मुलगा जोहर याचा मला अभिमान आहे. वर्ल्ड केम्पो चॅम्पियनशिपमध्ये त्याला ब्राँझ मेडल तर मिळालंच शिवाय 12 वीच्या परीक्षेतही त्याने कमाल करून दाखवली. खास करून अर्थशास्त्रामध्येही त्याला 94 टक्के गुण मिळवले.'

अमेठीमध्ये प्रतिष्ठेची लढत

स्मृती इराणी अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या धामधुमीतच स्मृती इराणींच्या मुलांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दिल्या आणि जोरदार यश मिळवलं. त्यामुळे आता स्मृती इराणींच्या परीक्षेचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

=====================================================================================

VIDEO: स्मृती इराणी रडक्या, नवज्योत सिद्धू यांचा टोला

First published: May 6, 2019, 3:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading