News18 Lokmat

स्मृती इराणींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, काँग्रेसने दिलं प्रत्युत्तर

राहुल गांधी यांना अमेठीशिवाय इतर राज्यातील मतदारसंघामधून लढण्यासाठी आग्रह केला जात आहे यावर इराणींनी टीका केली.

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 12:25 PM IST

स्मृती इराणींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, काँग्रेसने दिलं प्रत्युत्तर

नवी दिल्ली, 24 मार्च : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ट्विटरवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे की, अमेठीच्या लोकांनी राहुल गांधींना बाहेर घालवलं आहे. आता असं वातावरण तयार केलं जात आहे की दुसऱ्या राज्यातील लोकांना ते हवे आहेत. इराणी यांच्या या ट्वीटनंतर काँग्रेस आणि भाजप समर्थक एकमेकांना भिडले आहेत.लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी अमेठीशिवाय दुसऱ्या राज्यातील मतदारसंघातही लढण्याची शक्यता आहे. त्यावरुनच स्मृती इराणींनी ट्वीट केलं आहे. स्मृतीने म्हटलं आहे की, अमेठीने पळवून लावलं म्हणून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी लढण्यासाठी आग्रह होत असल्याचे नाटक केले जात आहे. त्यांना जनतेनंत नाकारलं असल्याचं इराणींनी म्हटलं आहे.

इराणींच्या ट्वीटनंतर काँग्रेसने पलटवार करत ट्वीट केले आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, चांदणी चौकमधून पराभव, अमेठीनेही पळवून लावले, इतक्या वेळा जनतेने नाकारले तरी राज्यसभेतून संसदेत प्रवेश केला. आता अमेठीतून पराभवाची हॅट्ट्रिक होणार असंही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

Loading...राहुल गांधींनी कर्नाटक, तामिळनाडु आणि केरळमधून निवडणूक लढवावी अशी मागणी होत आहे. याबद्दल रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरवरुन,'जनतेच्या या प्रेमासाठी आम्ही ऋणी आहोत. पक्ष त्यांच्या भावनांचा आदर करतो. तसेच राहुल गांधींच्या लढण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं.

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 10:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...