News18 Lokmat

'जोडे वाटून स्मृती इराणींनी राहुल नाही तर अमेठीचा अपमान केला'

प्रियांका गांधी यांनी स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 06:19 PM IST

'जोडे वाटून स्मृती इराणींनी राहुल नाही तर अमेठीचा अपमान केला'

अमेठी, 22 एप्रिल : अमेठी हा काँग्रेसचा गड. अमेठी कायम गांधी घराण्याच्या मागे उभी राहिली. पण, आता अमेठीतून राहुल गांधी यांचा पराभव करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. स्मृती इराणी या सतत राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. राहुल यांनी अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं. राहुल गांधी अमेठीमध्ये फिरत देखील नाहीत अशा शब्दात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत.

पण, राहुल यांच्यावर होणारे आरोप खोडून काढण्यासाठी आता प्रियांका गांधी यांनी स्मृती इराणींवर हल्ला चढवला आहे. स्मृती इराणी या अमेठीमध्ये येऊन राहुल यांच्यावर टीका करतात. पण, त्यांना राहुल यांनी केलेली कामं माहित आहे का? शिवाय, त्यांनी जोडे वाटून राहुल गांधींचा नाही तर अमेठीवासियांचा अपमान केल्याचं म्हणत प्रियांका यांनी स्मृती इराणी यांच्यावर हल्लाबोल केला.


राहुल गांधी यांच्या माफिनाम्यानंतरही काँग्रेसची घोषणा,चौकिदार चोरच आहे


Loading...

आणखी काय बोलल्या प्रियांका?

अमेठीच्या जनतेनं केव्हा भीक नाही मागितली. त्यांच्याकडे जे पण आलं ते सन्मानानं आलं. तुम्ही आमच्या पाठीशी कायम उभे राहिलात. ज्यांनी तुम्हाला जोडे वाटले त्यांना तुम्ही भिखारी नाही हे दाखवून द्या असं आवाहन यावेळी प्रियांका गांधी यांनी स्मृती इराणी यांना दिलं आहे.


अमेठीमध्ये चुरस

अमेठीमध्ये राहुल गांधी विरूद्ध स्मृती इराणी असा सामना रंगणार आहे. 2014मध्ये देखील स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना आव्हान दिलं होते. पण, मोदी लाटेत देखील लाखापेक्षा जास्त मतांनी राहुल गांधी विजयी झाले होते. पण, त्यानंतर स्मृती इराणी मागील पाच वर्षापासून अमेठीमध्ये सतत लक्ष ठेवून राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत.


VIDEO : राष्ट्रवादी नेत्याच्या घरावर गुंडांचा भीषण हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 06:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...