राहुल गांधींना 15 वर्षे जमलं नाही ते आता स्मृती इराणी करणार!

राहुल गांधींना 15 वर्षे जमलं नाही ते आता स्मृती इराणी करणार!

Smriti Irani In Amethi : स्मृती इराणी यांनी अमेठी दौऱ्या दरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं.

  • Share this:

अमेठी, 23 जून : गांधी घराण्याचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून अमेठीकडे पाहिलं जातं. पण, या मतदारसंघातून लोकसभा अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप उमेदवार स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी अमेठीमध्ये घर बांधून राहणार अशी घोषणा केली. स्मृती इराणींच्या या घोषणेबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. 15 वर्षे खासदार असलेले राहुल गांधी यांना देखील अमेठीमध्ये घर बांधून वास्तव्य करणं शक्य झालं नव्हतं. पण, आता स्मृती इराणी या अमेठीमध्ये घर बांधणार आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री केशव प्रसाद मौर्या यांच्या उपस्थितीमध्ये अमेठीत घर बांधण्याची घोषणा करताना त्यांनी मी अमेठीमध्ये पाहुणी म्हणून राहणार नाही. तर हक्काचं घर बांधणार आणि त्याची दारं सर्वांसाठी खुली राहतील असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनोज तिवारींना जीवे मारण्याची धमकी

राहुल गांधींवर टीका

दोन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर असलेल्या स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. या ठिकाणीहून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोक 5 वर्षे गायब राहतात. दिवा घेऊन अमेठीतील लोक त्यांना शोधतात त्यानंतर देखील ते सापडत नसल्याची टीका स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केली. अमेठीतून स्मृती इराणी यांनी 50 हजारांच्या मताधिक्यानं राहुल गांधी यांचा पराभव केला.

अडवाणी, जोशींची खासदारकी गेली; आता सरकारी बंगला कशासाठी?

15 वर्षे राहुल गांधी खासदार

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 15 वर्षे अमेठीचे खासदार राहिले आहेत. 2004मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांना 2019मध्ये पराभव स्वीकारावा लागला. त्यापूर्वी 1999मध्ये सोनिया गांधी अमेठीमधून विजय झाले होते.

SPECIAL REPORT: पुण्यातील मेट्रो स्टेशनचा तिढा सुटला! असं होणार मार्गाचं काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2019 12:01 PM IST

ताज्या बातम्या